Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

#CoronaVirus #Covid-19 #Latest Update : देश -दुनिया -महाराष्ट्र : राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या साडेचार हजाराच्यावर , मृत्यूची संख्या १४९, पुण्यात आज पाच बळी…

Spread the love

महाराष्ट्रात मुंबईनंतर पुणे शहरात करोनाचा सर्वाधिक संसर्ग झाला आहे. पुण्यात मागच्या काही तासांत करोनामुळं पाच जणांचा मृत्यू झाला असून आतापर्यंत करोना बळींची संख्या १३ वर गेली आहे.

पुणे शहरात रोजच्या रोज नव्या रुग्णांची नोंद होत आहे. काल मध्यरात्रीनंतर ९ नवे रुग्ण आढळून आले आहेत. नायडू, ससून व हडपसर येथील नोबेल रुग्णालयात बहुतांश करोनाग्रस्तांवर उपचार सुरू आहेत. त्यातील पाच जणांचा आज उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यात ससून रुग्णालयातील तिघांचा समावेश आहे. मृतांमध्ये एक ५० वर्षीय महिला आहे. अन्य दोघे हडपसर आणि कोंढाव्यातील राहणारे होते. यापैकी एकाचे वय ५४ तर दुसऱ्याचे वय ७१ वर्षे होते.नायडू रुग्णालयात एका ४४ वर्षांच्या व्यक्तीचा मृत्यू झाला. त्याला अनियंत्रित मधुमेहाचा आजार होता. त्यातच त्याचं मूत्रपिंडही निकामी झालं होतं. ४ एप्रिलपासून त्याला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. आज अखेर त्यानं प्राण सोडला. हडपसर येथील नोबेल रुग्णालयात एका ७३ वर्षीय जेष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला. ते सय्यदनगर येथील राहणारे होते. त्यांना मधुमेहाचा आजार होता.

CoronaVirus Pandemic #Covid-19 #Last updated: April 08, 2020, 09:55 GMT

World : दुनिया | Source : worldometers.info

एकूण रुग्ण : 14 लाख 46 हजार 344  | एकूण मृत्यू :  83 हजार 065  । उपचारानंतर बरे झालेले रुग्ण  : 3  लाख 08 हजार 553

India : भारत : 08 April 2020, 08:00 GMT+5:30 | Source : Ministry of Health and Family Welfare, GOI

एकूण रुग्ण :4643  | एकूण मृत्यू :  149 । उपचारानंतर बरे झालेले रुग्ण  : 401

भारत सरकारच्या आरोग्य विभागाने दिलेली राज्य निहाय ताजी आकडेवारी.
एकूण कोरोना रुग्णांची संख्या : 5194 | बरे झालेले रुग्ण : 402 |  मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या : 149
राज्यनिहाय रुग्णांची संख्या.
आंध्र प्रदेश 305 , 1
अंदमान निकोबार 10 , अरुणाचल प्रदेश 1 , आसाम 27,  बिहार 38 ,  चंदीगड 18, 7 ,  छत्तीसगड 10, 9 ,  दिल्ली 576, 21  , गोवा 7 ,  गुजरात 165 , 13 ,  हरियाणा 147, 3 , हिमाचल प्रदेश 18,  1 , जम्मू अँड काश्मीर 116,  2,  झारखंड 4,  कर्नाटक 175, 4 ,  केरला 336, 2, लडाख 14,  मध्य प्रदेश 229, 13, महाराष्ट्र 1018, 64,  मनिपुर 2, मिझोराम 1,  ओडिसा 42, 1 पांडेचेरी 5 , पंजाब 91, 7,  राजस्थान 328, 3,  तामिळनाडू690,07,  तेलंगणा 364, 07, उत्तराखंड 31,  उत्तर प्रदेश 326 , 3 , पश्चिम बंगाल 99, 5

आपलं सरकार

Click to listen highlighted text!