Aurangabad Crime : भामट्याने वकीलास ७ हजार रूपयांना गंडविले , संचारबंदीचे उल्लंघन करणा-या ११ जणांविरूध्द गुन्हा दाखल

औरंंंगाबाद : पेटीएम एक्झीकेटीव्ह असल्याची थाप मारून भामट्याने एका वकीलास ७ हजार ९९ रूपयांचा गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. वकीलास गंडा घातल्याचा प्रकार २१ मार्च रोजी सकाळी साडेनऊ ते दुपारी साडेबारा वाजेच्या दरम्यान घडला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, किशोर साहेबराव होके पाटील (वय ५२, रा.प्लॉट नंबर ४२८, सिडको एन-३) हे न्यायालयात सरकारी वकील म्हणून काम करतात. २१ मार्च रोजी भामट्याने होके पाटील यांच्या मोबाईलवर पेटीएमची लिंक पाठवली होती. त्यानंतर भामट्याने होके पाटील यांच्याशी संपर्क साधून पेटीएम एक्झीकेटीव्ह असल्याची थाप मारून होके पाटील यांच्याकडून बँक खाते, एटीएम कार्डाची माहिती घेतली. बँक खाते व एटीएम कार्डाची माहिती घेतल्यानंतर भामट्याने होके पाटील यांच्या बँक खात्यातून ऑनलाईनरित्या ७ हजार ९९ रूपये काढुन घेतले. याप्रकरणी पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात भामट्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास उपनिरीक्षक कापसे करीत आहेत.
संचारबंदीत चहाची विक्री करणा-या चौघांविरूध्द गुन्हा दाखल
औरंंंगाबाद : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शहरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. संचारबंदी लागू असतांना देखील चहाची विक्री करणाNया चार जणांविरूध्द जिन्सी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शेख कय्यूम शेख यूसूफ (वय ४६, रा.अल्तमश कॉलनी), शेख रशीद (वय ४५, रा.रहेमानीया कॉलनी) हे दोघे ३ एप्रिल रोजी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास रोशनगेट परिसरातील सदाबहार हॉटेल उघडे ठेवून चहाची विक्री करतांना मिळून आले. तसेच सय्यद नुरूल जोहेब (वय ३०, रा.आझाद चौक), वसीम साहेब खा पठाण (वय ३५, रा.किराडपूरा) हे दोघे ३ एप्रिल रोजी वॅâटलीमध्ये चहा विक्री करतांना जिन्सी पोलिसांना मिळून आले.
संचारबंदीचे उल्लंघन करणा-या १० जणांविरूध्द गुन्हा दाखल
संचारबंदीचे उल्लंघन करून रस्त्यावर फिरणा-या १० जणांविरूध्द शहरातील विविध पोलिस ठाण्यात ६ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. क्रांतीचौक, सिटीचौक, जवाहरनगर, जिन्सी, सिडको, वाळुज पोलिस ठाण्यात प्रत्येकी १ गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लोडींग रिक्षाच्या धडकेत दुचाकीस्वार जखमी
भरधाव जाणा-या लोडींग रिक्षाने पाठीमागून दिलेल्या धाडकेत दुचाकीस्वार अशोक वुुंâडलिक वल्ले (वय २६, रा.पांढरओव्हळ, ता.गंगापूर) हा तरूण गंभीर जखमी झाला. अशोक वल्ले हे २० मार्च रोजी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास दुचाकी क्रमांक (एमएच-२०-डीडब्ल्यू-३२६७) वर शिवपूर शिवारातील उत्कर्ष पेट्रोलपंपासमोरून जात होते. त्यावेळी पाठीमागून आलेल्या लोडींग रिक्षा क्रमांक (एमएच-२०-ईएल-३२६७) ने दुचाकीस धडक दिली होती. याप्रकरणी लोडींग रिक्षा चालक अप्पासाहेब निकम (रा.शेंदुरवादा) यांच्याविरूध्द वाळुज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक फौजदार बुट्टे करीत आहेत.
स्थलांतर करणा-या ९ मजूरांना पोलिसांनी रोखले
औरंंंगाबाद : कोरोना विषाणूचा वाढत्या प्रार्दुभावाला रोखण्यासाठी लॉकडाऊन झाल्यानंतर संचारबंदी लागू करण्यात आली आहे. लॉकडाऊन झाल्यानंतर उपासमारीची वेळ आलेल्या ९ मजूरांना स्थलांतर करतांना गुन्हे शाखेच्या पोलिसांनी शनिवारी (दि.४) रोखले. स्थलांतर करणाNया मजूरांना रोखल्यानंतर त्यांची रवानगी सेल्टर हाऊस (निवारागृह) येथे करण्यात आली आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालूक्यात गेल्या काही वर्षापासून मध्यप्रदेशातील बNहाणपूर येथील ९ मजूर रोजगारानिमित्त वास्तव्यास होते. कोरोना विषाणूने भारतात थैमान घालण्यास सुरूवात केल्यानंतर देशात २१ दिवसाचा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. लॉकडाऊनमुळे रोजगार गेल्यामुळे उपासमारीची वेळ आलेले ९ मजूर अहमदनगर येथून मध्यप्रदेशातील बNहाणपूर येथे पायी जात होते.
गस्तीवर असलेले गुन्हे शाखेचे सहाय्यक फौजदार नंदकुमार भंडारे व त्यांच्या पथकातील कर्मचाNयांनी या मजूरांना सुभेदारी विश्रामगृहाजवळ ताब्यात घेतले. त्यानंतर सर्व ९ जणांची रवानगी सेल्टर हाऊस येथे करण्यात आली.