Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

#CoronaVirusUpdate : कोरोना लपवून पार्ट्या करीत फिरणाऱ्या “त्या ” गायिकेविरुद्ध एफआयआर , मुंख्यामंत्री योगी आदित्यनाथ यांचे आदेश

Spread the love

देशभरातील नागरिक कोरिया व्हायरसने भयग्रस्त असतानाही बॉलिवूड गायिका कनिका कपूरने तिला कोरोना व्हायरस असतानाही आयसोलेशनमध्ये जाण्याऐवजी लखनौ आणि कानपूरमध्ये अनेक पार्ट्यांना हजेरी लावल्याबद्दलचे वृत्त प्रसिद्ध होताच , उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी उच्चस्तरीय  बैठक बोलावून या बैठकीत तिच्या विरोधात एफआयर नोंदवण्याचे आदेश दिले. वस्तुस्थिती लपवल्याबद्दल आणि जनमानसाचं आयुष्य धोक्यात घातल्याबद्दल कनिकाविरोधात एफआयआर नोंदविण्यात येणार आहे. स्वतः मुख्यमंत्र्यांनी हे आदेश दिले आहेत.

विमानतळावरूनही चाचणीविना निसटली कनिका 

दरम्यान उपलब्ध  माहितीनुसार, कनिका कपूर करोनाच्या चाचणीत पॉझिटीव्ह निघाली. कनिका येथील ताज या पंचतारांकित हॉटेलमध्ये ६०२ या रूममध्ये ती राहत होती. ही रूम दोन दिवसांसाठी बंद करण्यात आली आहे. अधिकारी आता सीसीटीव्ही फुटेजमधून गायिका हॉटेलमध्ये कुठे कुठे फिरली ते शोधत आहेत. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने याबद्दल माहिती देताना सांगितले की, ‘कनिकाविरोधात एफआयआर दाखल करण्यात येणार आहे. ती लंडनहून परत आली आणि भारतात आल्यावर तिला करोना व्हायरसबद्दल पूर्ण माहिती होती. असं असतानाही विमानतळावर तिने चाचणी केली नाही. करोनाची लक्षणं जाणवत असतानाही ती खुलेआम फिरत राहिली आणि गर्दीतही गेली.’

आरोग्यमंत्रीही  पार्ट्यांना उपस्थित 

विशेष धक्कादायक गोष्ट म्हणजे उत्तर प्रदेशचे आरोग्य मंत्री जयप्रताप सिंगही या बैठकीत उपस्थित होते. अकबर अहमद डम्पी यांनी दिलेल्या पार्टीत आरोग्य मंत्रीही गेले होते. याच पार्टीत कनिका कपूरही होती. यामुळेच जयप्रताप यांना आयसोलेट होण्यास सांगितले होते. मात्र तरीही ते या बैठकीला उपस्थित होते. शुक्रवारी दुपारी सिंग यांनी करोना विषाणूची चाचणी केली. उपमुख्यमंत्री दिनेश शर्मा आणि केशव मौर्या, मंत्रीमंडळातील मंत्री आणि पक्षाचे सचिव (संघटना) सुनील बन्सलही या बैठकीत उपस्थित होते. या बैठकीत उत्तर प्रदेशमधील स्थितीवर प्रदीर्घ चर्चा करण्यात आली.

लोकयायुक्तांच्या घरीही पार्टी 

याशिवाय लोकायुक्त संजय मिश्रा यांच्या घराचीही तपासणी करण्यात आली. मिश्रा यांनीही एका पार्टीचं आयोजन केलं होतं. या पार्टीला कनिका कपूर उपस्थित होती. यामुळेच मिश्रा आणि त्यांच्या कुटुंबियांना क्वारन्टाइन होण्यास सांगण्यात आलं. तसेच या दरम्यान सर्व सुरक्षेच्या बाबीही पाळण्यास सांगितल्या. याशिवाय अपक्ष आमदार आणि माजी मंत्री रघुराज प्रताप सिंग उर्फ राजा भैया यांनीही स्वतःला आयसोलेट केलं आहे. राजा भैय्या हे डम्पी यांनी दिलेल्या पार्टीत गेले नव्हते. मात्र त्याच दिवशी ते डम्पी यांच्या घरी भेटायला गेले होते. नोएडा आमदार पंकज सिंग यांच्यासह अजून तीन आमदारांनी स्वतःला आयसोलेट करून घेतले आहे. गुरुवारी आरोग्य मंत्री जयप्रताप सिंग यांनी घेतलेल्या बैठकीत ते उपस्थित होते. या सर्व प्रकारामुळे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ संतप्त झाले आहेत.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!