Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

#NewsUpdate Live : गल्ली ते दिल्ली : एक नजर : सर्व महत्वाच्या बातम्या एका क्लिकवर आणि एका नजरेत….

Spread the love

भारतात आत्तापर्यंत  एकूण १३७ करोनाग्रस्त रुग्ण सापडले आहेत. यातील १४ जणांवर यश्वी उपचार झालेत तर तीन जणांचा मृत्यू झालाय, अशी माहिती आरोग्य मंत्रालयानं मंगळवारी सायंकाळी जाहीर केलीय. राज्यातील करोनाग्रस्तांचा आकडा झपाट्यानं वाढत आहे. महाराष्ट्रात आज करोनाचा पहिला बळी मुंबईत गेला असून, आणखी एका रुग्णाला करोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे. तर पिंपरी-चिंचवडमधील एकाचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळं राज्यातील करोनाग्रस्तांचा आकडा ४१ वर पोहोचला आहे. मुंबईत करोनाचा आणखी एक रुग्ण सापडला आहे. तो अमेरिकेहून आला आहे. तर पिंपरी-चिंचवडमध्ये आणखी एकाला करोनाची लागण झाली आहे. पुण्यातील पॉझिटिव्ह रुग्णाची संख्या १७ झाली आहे. पिंपरीमधील ही व्यक्ती अमेरिकेतून दुबईला गेली आणि नंतर मुंबईमार्गे पुण्यात आली आहे. विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी ही माहिती दिली.


पुण्यात आणखी एक रुग्ण , एकूण संख्या १८

पुण्यात आणखी एकाला लागण झाल्याचे रात्री निदान झाले. एकूण रुग्णांची संख्या १८ झाली असून हा रुग्ण पुण्यातील आहे. हा रुग्ण १४ मार्चला नेदरलँड आणि फ्रान्सचा प्रवास करून आला होता. पुण्यात ८ आणि पिंपरी चिंचवड मध्ये १० असे एकूण १८ रुग्ण पुण्यात झाल्याची नोंद आरोग्य खात्याने केली आहे. पुण्यात परदेशातून आलेल्या सर्व प्रवाशांना आता थेट रुग्णालयात चोवीस तास ‘क्वारंटाइन’ करणे बंधनकारक. निर्णयाची अंमलबजावणी गुरुवारपासून. विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली माहिती. दरम्यान रेशन दुकानांवर बायोमेट्रिक न करता नागरिकांना धान्याचे वितरण केले जाणार आहे.

१. बहुचर्चित निर्भया सामूहिक बलात्कार आणि खून प्रकरणातील आरोपींना २० मार्च रोजी पहाटे ५.३० वाजता फाशी देण्यासाठी डेथ वॉरंट जरी केले असले तरी त्यांच्या वकिलाच्या कारवाया सुरूच आहेत. एकीकडे त्यांच्या वकिलाने आंतरराष्ट्रीय न्यायालयात प्रकरण दाखल केले असताना दुसरीकडे य प्रकरणातील आरोपी अक्षय ने पुन्हा तुरुंग प्रशासनामार्फत राष्ट्रपतींकडे दया याचिका पाठविली आहे. तर आणखी एक आरोपी पवनकुमार याने पुन्हा सर्वोच्च न्यायालयात क्युरेटिव्ह याचिका दाखल केली आहे कि , गुन्हा घडला त्यावेळी तो अल्पवयीन होता त्यामुळे त्याची फाशी रद्द करून जन्मठेपेची शिक्षा देण्यात यावी. दरम्यान गुन्हा घडला तेंव्हा आपण दिल्लीत नव्हतोच अशी याचिका मुकेशने दाखल केली होती परंतु दिल्ली न्यायालयाने हि याचिका फेटाळली आहे.

२. मुंबईतील दक्षिण आणि दक्षिण मध्य रेल्वेने आपल्या २३ आणि १७ गाड्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द केलेल्या असतानाच पश्चिम रेल्वेनेही आपल्या १० गाड्या १ एप्रिलपर्यंत रद्द केल्या आहेत या १० गाड्यांचे वृत्त पुढील प्रमाणे आहे.

३.मध्य आणि उत्तर रेल्वेने  रेल्वे स्थानकावरील अनावश्यक प्रवाशांची गर्दी टाळण्यासाठी प्लॅटफॉर्म तिकीटाची किंमत १० रुपयांवरून थेट ५० रुपये केली आहे.

४. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर दिल्लीतील सर्व आंदोलने कार्यक्रम दिल्ली पोलिसांनी रद्द केले असल्याची अधिसूचना जारी केली आहे. पश्चिम बंगालमध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला असून तो १८ वर्षाचा आहे.  तो लंडनहून आलेला होता. त्याला विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे.

५. केंद्रीय आरोग्य खात्याने कोरोना व्हायरसच्या रुग्णांचा प्रवास निषिद्ध करण्यासाठी अफगाणिस्तान , फिलिपाईन्स आणि मलेशिया येथून येणाऱ्या विमानांना बंदी केली आहे. दरम्यान खासगी प्रयोगशाळांनी COVID- 19 ची विनामूल्य चाचणी करून देण्याचे आवाहन आरोग्य विभागाचे संचालक लव्ह अग्रवाल यांनी केले आहे.

६. कोरोनामुळे गेल्या २४ तासात इराणमध्ये १३५ जणांचा मृत्यू झाल्याने आता एकूण संख्या ९८८ इतकी झाली आहे ( ए एफ पी न्यूज )

७. सर्वोच्च न्ययालयाचे निवृत्त मुख्य न्यायाधीश रंजन गोगई यांच्या राज्यसभा नियुक्तीवर काँग्रेसने आज सडकून टीका केली. आपल्या  नियुक्तीवर बोलताना न्या. गोगई म्हणले कि , मी राष्ट्रपतींनी माझी नियुक्ती राज्यसभेवर केल्यानंतर हि नियुक्ती मी का स्वीकारली यावर खासदारपदाची शपथ घेतल्यानंतर प्रेसशी बोलेल असे म्हटले आहे.

८. मुंबईतील सर्व चित्रीकरण थांबविण्याचा निर्णय संघटनेने घेतल्यानंतर गोरेगाव येथील दादासाहेब फाळके चित्रनगरीत शुकशुकाट पसरला आहे. दरम्यन मुंबईतील सर्व प्रेक्षणीय आणि धार्मिक स्थळे बंद करण्यात आले आहेत.

१०. पाकिस्तानमध्ये करोनाचा संसर्ग वाढत असल्याचे चित्र असून पाकिस्तानने इतर देशांसमोर हात पसरण्यास सुरुवात केली आहे. करोनाशी मुकाबला करण्यासाठी पाकिस्तानला आर्थिक मदत करण्याची मागणी पंतप्रधान इम्रान खान यांनी श्रीमंत देशांना केली आहे. पाकिस्तानमध्ये १९३ जणांना करोनाचा संसर्ग झाला असून एकाचा मृत्यू झाला आहे. इराणच्या सीमेलगत असलेल्या सिंध प्रातांत करोनाच्या संसर्गाच्या रुग्णांची संख्या वाढल्यामुळे पाकिस्तानमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे. एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, सिंध प्रांतात १५५, खैबर पख्तूनख्वामध्ये १५, बलुचिस्तानमध्ये १०, गिलगिट बालिस्तानमध्ये पाच, इस्लामाबादमध्ये दोन आणि पंजाबमध्ये एकाला करोनाचा संसर्ग झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

११. पोलिस उपनिरीक्षक परीक्षेचा निकाल जाहीर, औरंगाबादचा दिलीप वाव्हळ मागासप्रवर्गातून पहिला

१२. कोरेगाव-भीमा चौकशी आयोगाने पुण्यात मार्चच्या अखेरच्या आठवड्यात नियोजित असलेली सुनावणी पुढे ढकलली

१३. भारतीय हवाईदलाच्या एअरमन पदासाठी १९ मार्च ते २३ मार्च २०२० दरम्यान आयोजित भरती परीक्षा पुढे ढकलली. अधिक माहितीसाठी www.airmenselection.cdac.in इथे संपर्क साधा

१४. मध्य प्रदेश- बहुमत चाचणी प्रकरण: बहुमत चाचणी आज टळली… सुप्रीम कोर्टाची विधानसभा अध्यक्षांना नोटीस, उद्या उत्तर देण्याच्या केल्या सूचना, पुढील सुनावणी उद्या

आपलं सरकार

Click to listen highlighted text!