Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Good News : लंडन येथील “आंबेडकर हाऊस” या वास्तूत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकास मंजुरी

Spread the love

लंडन येथील आंबेडकर हाऊस या वास्तूत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक उभे करण्यास कोणतीच हरकत नाही, असा निकाल याप्रकरणी ब्रिटन शासनाने नेमलेल्या चौकशी समितीने नुकताच दिला आहे, अशी माहिती माजी सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांनी दिली. या स्मारकामुळे जगभरातील आंबेडकर अनुयायांचे स्वप्न पूर्ण होणार आहे. या कामी सहकार्य केलेल्या व पाठिंबा दिलेल्या सर्व अधिकारी वर्गाचे व कायदे तज्ज्ञांचे मी आभार मानतो , असे माजी सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांनी म्हटले आहे.

‘लंडन येथील १० किंग हेन्री रोड, एनडब्लू ३ येथील वास्तूमध्ये  डॉ. आंबेडकर यांचे स्मारक बनविण्याच्या निर्णयाला तेथील स्थानिक प्रशासन यंत्रणेने आक्षेप घेतला होता आणि स्मारक बनविण्याची विनंती फेटाळली होती. त्याविरुद्ध महाराष्ट्र सरकारने ब्रिटन सरकारकडे तक्रार केली होती. या तक्रारीची चौकशी करण्यासाठी ब्रिटन सरकारच्या शहर नियोजन विभागाचे निरीक्षक केरी विल्यम्स यांच्या नेतृत्वाखालील समितीची नियुक्ती करण्यात आली होती.या समितीपुढे  तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माझ्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र शासनातर्फे आपल्या वकिलांमार्फत बाजू मांडण्यात आली, अशी माहिती तत्कालीन सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांनी दिली आहे. आता या वास्तूचे निवासी क्षेत्रातून म्युझीयम डी १ मध्ये रूपांतर करण्यास परवानगी देण्यात आली आहे. तसेच या वास्तूमध्ये आवश्यक त्या दुरुस्त्या करण्यास परवानगी देण्यात आली आहे. संरक्षक भिंत , रेलिंग व दिव्यांगांसाठी लिफ्टचे काम करण्यासही परवानगी देण्यात आली आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे लंडन येथे शिक्षण घेत असताना १९२१-२२ या काळात लंडन शहरात वास्तव्यास होते. ही वास्तू लंडनमधील भारतीय उच्चायुक्तांच्या माध्यमातून महाराष्ट्र शासनाने विकत घेतली आहे. त्यांच्यामार्फतच या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक व वास्तूच्या नूतनीकरणाचे काम सुरू आहे. तेथील स्थानिक स्वराज्य संस्थेने  या निवासस्थानाचे स्मारकात रूपांतर करण्याबाबत आक्षेप घेतला होता . तेथील स्थानिक प्रशासन यंत्रणेने उपस्थित केलेल्या आक्षेपांवर उत्तर देताना असे सांगण्यात आले की  ज्यावेळी ही वास्तू विकत घेतली, त्यावेळी ती अत्यंत जीर्ण अवस्थेत होती. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून तिचे तातडीने नूतनीकरण करणे आवश्यक होते.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!