Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Corona Virus : केरळमध्ये हाय अलर्ट , मार्च अखेरपर्यंत चित्रपटगृहे बंद, नागरिकांना सतर्कतेचा सूचना

Spread the love

केरळमध्ये आज करोना व्हायरसचे ९ नवे रुग्ण आढळून आल्यानंतर राज्य सरकारने आणखी खबरदारीची पावलं उचलली आहेत. दुसरीकडे मल्याळम चित्रपटगृह संघटनेने केरळमधील सर्व चित्रपटगृह ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. कोच्चीत झालेल्या बैठकीनंतर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. करोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आम्ही हा निर्णय घेतल्याचं मल्याळम चित्रपटगृह संघटनेनं सांगितलं. दरम्यान याबाबत केरळच्या मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना इटलीत अडकलेल्या भारतीयांच्या संदर्भात पात्र लिहिले आहे. कोरोनाच्या चाचणी निगेटिव्ह असल्याशिवाय कोणलाही विमानाचा प्रवास करत येणार नाही असा निर्णय अनेक देशांनी घेतला आहे.

सध्या जगभरात कोरोनाचे १ लाख १३ हजार रुग्ण आहेत. तसेच जवळपास ४ हजार जणांना यामुळे प्राण गमवावे लागले आहेत. पहिल्यादा डिसेंबर २०१९  मध्ये चीनच्या वुहान प्रांतात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला. त्याला तीन महिन्यांचा कालावधी झाला तरी अद्याप या व्हायरसला रोखण्यात यश आलेलं नाही. यासाठी आवश्यक ती सर्व प्रकारची खबरदारी घेतली जात असून वेगवेगळे उपाय अनेक देशांनी केले आहेत. नागरिकांना सतर्क राहण्याची सूचनाही दिली आहे.

देशात करोनाचा पहिला रुग्णही केरळमध्येच आढळला होता. चीनच्या वुहानमधून परतलेल्या मेडिकलच्या एका विद्यार्थीनीला करोनाची लागण झाली होती. ती मुलगी देशातील करोनाची पहिली रुग्ण ठरली. उपचारानंतर आता तिची प्रकृती ठणठणीत आहे. दरम्यान केरळच्या एर्नाकुलममध्ये तीन वर्षांच्या एका मुलाला करोनाची लागण झाली आहे. वैद्यकीय तपासणीत त्यांचे नमुने पॉझिटिव्ह आढळून आलेत. कुटुंबासोबत हा मुलगा इटलीला पर्यटनासाठी गेला होता. एर्नाकुलम मेडिकल कॉलेजमधील स्वतंत्र कक्षात त्याच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान, या मुलासह त्याच्या आई-वडिलांनाही करोनाची लागण झाली आहे. करोनाच्या चाचणीत त्यांचे नुमनेह पॉझिटिव्ह आढळून आले असल्याची माहिती केरळच्या आरोग्य मंत्री के.के. शैलजा यांनी दिली.

 

आपलं सरकार

Click to listen highlighted text!