अपघातामुळे मारहाण झालेल्या तरुणाकडून दंगल घडवण्याचा प्रयत्न पोलिसांच्या सतर्कतेमुळे फसला

औरंगाबाद – मोटरसायकलच्या किरकोळ अपघातामुळे मार खाणार्या तरुणाने सोशल मिडीयावर वादग्रस्त व्हिडीओ टाकून दंगल घडवण्याचा प्रयत्न केला.शहर पोलिसांनी वेळीच या प्रकाराची दखल घेत प्रकरण मिटवले व अशा अफवा पसरविण्याचे कोण काम करीत आहे, याचा शोध घेण्याचे आदेश दिले असल्याची माहिती पोलिस आयुक्त चिरंजीवप्रसाद यांनी दिली. दरम्यान पूर्ण तपासानंतर या प्रकरणात अटकेची कारवाई होईल असे पोलिसांनी सांगितले
मंगळवारी संध्याकाळी ५ वा. एम.जी परिसरात मोटरसायकलच्या किरकोळ अपघातानंतर आरेफ काॅलनीतील रहिवासी हसन जावेद याला काही तरुणांनी मारले. त्याने घरी परतल्यानंतर त्याच्या काॅलनीतील मित्रांना हा प्रकार सांगितला. त्यानंतर हसन जावैद च्या मित्रांनी हसन जावेदला ३१सेकंदाचा व्हिडीओ तयार करण्यास भाग पाडले.त्या व्हिडीओ मधे हसन जावेद ने सांगितले की, त्याला एम.जी.एम. परिसरात सात ते आठ तरुणांनी जय श्रीराम म्हंण असे म्हणंत सिगारैट चे चटके चेहर्यावर दिले व बेदम मारहाण केली. सोशल मिडीयावर हा व्हिडीओ काही क्षणांत व्हायरंल झाल्यानंतर पोलिस निरीक्षक व्यंकटेश केंद्रे यांनी घटनास्थळी धाव घेत घडलेल्या प्रकाराची माहिती घेतली व आरेफ काॅलनीतून हसन जावैद ला पकडले व सिडको पोलिसांच्या हवाली केले.दरम्यान सिडको पोलिस ठाण्यात शेकडो लोक जमा झाले होते. परिस्थिती नियंत्रणात आणण्या करता गुन्हेशाखेचे सहाय्यक पोलिसआयुक्त डाॅ नागनाथ कोडे, पोलिस निरीक्षक अनिल गायकवाड, एपीआय अजबसिंग जारवाल सिडको पोलिस ठाण्यात आले. डाॅ.कोडे यांनी हसन जावेद ला विश्र्वासात घेत संपूर्ण घटनाक्रम जाणून घेतला. आरोपी जावेद ने हा व्हिडीओ आपल्याला तयार करण्यास भाग पाडल्याचे सांगितले. या प्रकरणात अपघात आणि शांतता भंग करण्याचा गुन्हा दाखल झाल्याचे पोलिस निरीक्षक अनिल गायकवाड यांनी सांगितले.या वेळी पोलिस उपायुक्त राहूल खाडे, पोलिस निरीक्षक गिरी यांची उपस्थिती होती.