Aurangabad Crime अडीच महिन्यापूर्वी बापाचा खून करून खड्ड्यात पुरून टाकले पण खुनाला वाचा फुटलीच , शाळकरी मुलाचे दुष्क्रुत्य !!

दहावीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलानेच वडिलांकडून होणाऱ्या सततच्या मारहाणीला कंटाळून बापाचा खून केल्याची धक्कादायक घटना औरंगाबाद जिल्ह्यात उघड झाली आहे. खून केल्यानंतर मुलाने गेल्या अडीच महिन्यापासून घरातच मृतदेह सुद्धा गाडून ठेवला होता. कन्नड़ तालुक्यातील जामड़ी घाट या गावातील ही धक्कादायक घटना आहे. दारू पिऊन वडिलांकडून सतत मारहाण होती. अखेर कंटाळून मुलाने जन्मदात्याचाच खून केला. मुलाने आधी वडिलांच्या डोक्यावर काठीने वार केले. मात्र तरीही त्यांचा जीव गेला नाही, म्हणून नंतर फाशी दिली. या घटनेचा उलगडा झाल्यानंतर कन्नड तालुक्यात खळबळ उडाली आहे.
वडिलांची हत्या केल्यानंतर गावात कोणाला खबरबात कळू नये म्हणून आरोपी मुलाने मृतदेह घरात गाडून टाकला आणि पोलिसांत वडील हरवल्याची तक्रार दिली. मात्र मयताच्या भावाने विश्वासात घेऊन मुलांकडे चौकशी केली असता मुलाने काकाला सत्य सांगितलं. मुलाने वडिलांची हत्या केल्याची कबुली काकाकडे दिल्यानंतर हा प्रकार पोलिसांना कळाला. पोलिसांनी घरात खड्डा करून मृतदेह ताब्यात घेतला आहे. मात्र अल्पवयीन मुलानेच बापाची हत्या केल्याने परिसरात मोठी खळबळ आहे.