Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

पूर्वग्रहावर आधारित राष्ट्रवाद आणि ‘भारत माता की जय’ च्या घोषणांच्या बाबतीत काय बोलले मनमोहनसिंग ?

Spread the love

भारताची जहाल प्रतिमा निर्माण करण्यासाठी राष्ट्रवाद आणि ‘भारत माता की जय’ च्या घोषणांचा दुरुपयोग केला जातोय. यामुळे नागरिकांमध्ये मोठी दरी निर्माण होत असल्याचा गर्भित इशारा माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी दिला आहे.  मनमोहनसिंग यांनी पंडित नेहरुंच्या कामांचा आणि भाषणांचा उल्लेख करत भाजपवर हल्लाबोल केला आहे. भारताकडे एक मोठी शक्ती म्हणून बघितलं जात आहे. बलाढ्य देशांसोबत भारतीय लोकशाहीची तुलना होते. याचं श्रेय पंडित जवाहर लाल नेहरुंना जातं. ज्यांनी हा देश घडवला, असं मनमोहनसिंग म्हणाले. पुरुषोत्तम अग्रवाल आणि राधा कृष्ण यांच्या ‘हू इज भारत माता’ या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभागत मनमोहनसिंग बोलत होते.

मनमोहनसिंग पुढे म्हणाले कि , देशात अस्थिरता होती  त्यावेळी नेहरुंनी देशाचं नेतृत्व केलं. वेगवेगळ्या सामाजिक आणि राजकीय विचारांना त्यांनी आपलसं केलं होतं. बहुभाषी असलेल्या नेहरुंनी अतिशय अनोख्या पद्धतीने आधुनिक भारताच्या विद्यापीठांची आणि सांस्कृतिक संस्थांची पायाभरणी केली, असं मनमोहनसिंग यांनी सांगितलं.  दुर्दैवाने सध्या देशाताली एका गटाला इतिहास वाचण्यात कुठलीही रुची नाहीए. तसेच  ते पूर्वग्रहाने पुढे वाटचाल करत आहेत. यामुळेच ते नेहरुंची प्रतिमा चुकीच्या पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न करत आहेत. पण अशा खोटेपणाला नाकारण्याची क्षमता इतिहासात आहे, असा टोला मनमोहनसिंग यांनी भाजपला लगावलाय. ‘हू इज भारत माता’ हे पुस्तक वास्तवाला धरून आहे. राष्ट्रवाद आणि ‘भारत माता की जय’ च्या घोषणा ह्या देशाची जहाल आणि तीव्र भावना मांडणारी प्रतिमा निर्माण करण्यासाठी दुरुपयोग केला जातोय. लाखो नागरिकांमध्ये ह्यामुळे दुरावा निर्माण होतोय, असं मनमोहनसिंग म्हणाले.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!