Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Donald Trump India Tour : “नमस्ते ट्रम्प “ची अहमदाबादेत तयारी पूर्ण , केंद्रीय गृहमंत्री अमित शहा जातीने उपस्थित…

Spread the love

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे उद्या दोन दिवसाच्या भारत दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात त्यांची पत्नी मेलेनिया, मुलगी इवांका आणि जावई जरेड कुशनर हे सोबत असतील. अहमदाबादमध्ये त्यांचे भव्य स्वागत करण्यात येणार आहे. ट्रम्प अहमदाबादमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत रोड शो करतील. यानंतर मोटेरा स्टेडियममधील ‘नमस्ते ट्रम्प’ या कार्यक्रमात ते सभेला संबोधित करतील. दरम्यान ट्रम्प यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर अहमदाबादमध्ये कडेकोट सुरक्षा व्यवस्था केली गेलीय. अमेरिकेच्या गुप्तचर संस्थांच्या अधिकाऱ्यांसह भारताचे एनएसजी आणि एसपीजीचे कमांडोही तैनात करण्यात आलेत. मार्गात ड्रोन आल्यास तो पाडण्यासाठीची यंत्रणाही सज्ज ठेवण्यात आली आहे. तसेच  एनएसजीची अँन्टी स्नायपर टीमही तैनात केली गेली आहे. या सर्व सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी खुद्द केंद्रीय गृहमंत्री अमित शहा अहमदाबादमध्ये हजर आहेत.

ट्रम्प साबरमती आश्रमालाही  भेट देण्याची शक्यता आहे. यामुळे आश्रमातही सर्व तयारी करण्यात आली आहे. नियोजनानुसार ट्रम्प हे अहमदाबाद विमानतळावर उतरतील. तिथे त्यांचं भव्य स्वागत होईल. यानंतर पंतप्रधान मोदी आणि ट्रम हे २२ किमी रोड शो करतील. पंतप्रधान मोदींनी ट्रम्प यांच्या स्वागताचा व्हिडिओही ट्विट केलाय. ट्रम्प यांच्या २२ किमीच्या रोड शोमध्ये १ लाखांहून अधिक नागरिक सहभागी होतील. या ‘रोड शो’ला अहमदाबाद महापालिकेने ‘इंडिया रोड शो’ असं नाव दिलं आहे.

या निमित्ताने येणाऱ्या पाहुण्यांसह नागरिकांच्या स्मरणात हा ‘रोड शो’ राहिल याची पूर्ण काळजी शहराच्या यंत्रणांनी घेतलीय. तसंच या रोड शोमध्ये सहभागी व्हा, असं आवाहन अहमदाबाद महापालिकेचे आयुक्त विजय नेहरा यांनी ट्विटद्वारे केलंय. रोड शोनंतर मोदी आणि ट्रम्प हे ‘नमस्ते ट्रम्प’ या कार्यक्रमासाठी मोटेरा स्टेडियममध्ये दाखल होतील. तिथे दोन्ही नेते नागरिकांना संबोधित करतील. या स्टेडियमची १ लाख १० हजार इतकी प्रेक्षक क्षमता आहे. जुनं स्टेडियम तोडून तिथे नवीन स्टेडियम बांधण्यात आलंय. जुनं स्टेडियम १९८२ मध्ये बांधलं गेलं होतं. त्याची आसन क्षमता ४९ हजार इतकी होती.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!