Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

अनैतिक संबंधात अडसर नको म्हणून , पत्नीनेच प्रियकराच्या मदतीने पतीचा काढला काटा, सोशल मीडियाच्या मदतीने अवघ्या सहा तासात पोलिसांनी लावला छडा

Advertisements
Advertisements
Spread the love

वैजापूर तालुक्यातील तिडी शिवारात अंध व्यक्तिच्या डोक्यात गजाने वार केल्यानंतर त्याचा मृतदेह पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न झाला होता. या व्यक्तिचा खून अनैतिक संबंधातून पत्नी व तिच्या प्रियकराने केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. याप्रकरणी पोलीसांनी प्रियकराला अटक केली आहे. यासीन शेख वजीर शेख (रा. कसाबखेडा, ता. खुलताबाद) असे मारेक-याचे नाव आहे.

Advertisements

तीन दिवसांच्या इज्तेमासाठी घराबाहेर पडलेल्या तिडी-सवंदगाव रस्त्यावरील रघुनाथ डुकरे यांच्या शेतात गुरुवारी सकाळी आठच्या सुमारास सय्यद अशरफ सय्यद नूर (रा. कसाबखेडा, ता. खुलताबाद) यांचा अर्धवट जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळुन आला होता. या घटनंनतर वैजापूर पोलीसांसह स्थानिक गुन्हे शाखा पोलीसांनी धाव घेतली होती. वैजापूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक अनंत कुलकर्णी, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक भागवत फुंदे यांच्यासह श्वान पथक, ठसे तज्ज्ञ देखील घटनास्थळी दाखल झाले होते. यावेळी पोलीसांनी घटनास्थळावरुन लोखंडी गज, अंधाची काठी, काडेपेटी आणि पेट्रोलची रिकामी बाटली जप्त केली होती. पोलीसांनी या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी सोशल मिडीयावर मयताचा फोटो व्हायरल केला होता. त्यावरुन एका पत्रकाराने हा व्यक्ति कसाबखेडा येथील असल्याचे पोलीसांना सांगितले होते. त्यानंतर पोलीसांनी कसाबखेड्यात कुटुंबियांचा शोध घेतला. तेव्हा कुटुंबियांनी सय्यद अशरफ हे तीन दिवसांच्या जांभाळा येथील इज्तेमामध्ये गेल्याचे सांगितले होते. त्याला पहाटे झोपेतच उचलून आणत खून केल्याचा अंदाज पोलीसांनी व्यक्त केला होता.

Advertisements
Advertisements

सहा तासात आवळल्या मुसक्या

सय्यद अशरफ यांच्या मारेक-यांचा शोध घेत स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक भागवत फुंदे, उपनिरीक्षक भगतसिंग दुलत यांनी तपास चक्रे फिरविली. गोपनीय माहितीआधारे पोलीसांनी यासीन शेख याला कसाबखेड्यात पकडले. सुरूवातीला त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. परंतू, खाक्या दाखवताच त्याने सय्यद अशरफ याच्या पत्नीसोबत सुमारे पाच-सहा वर्षांपासून अनैतिक संबंध होते. सय्यद अशरफ हा त्यांच्या संबंधात अडसर ठरत होता. त्यामुळे त्याचा काटा काढल्याची कबुली दिली.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!