बीड पोलीस दलातील लिंग परिवर्तन करून “ललिता”चा “ललित” झालेला तरुण तुम्हाला आठवतो का ? त्याच्या लग्नाची ही बातमी….

बीड जिल्ह्याच्या पोलीस दलातील कर्मचारी ललिता साळवे हे नाव आपणास आठवते का ? बातमी अशी आहे कि , शरीरातील हार्मोन्स बदलामुळे लिंगबदल करण्याची परवानगी पूर्वाश्रमीच्या महिला पोलिस कर्मचारी ललिता साळवे हिने रीतसर लीगबदलाची परवानगी मागितली होती . पोलीस महासंचालकापर्यंत हे प्रकरण गेले होते अखेर ललिताने स्वतःवर लिंगबदल शस्त्रक्रिया केल्यानंतर ललिता पासून ललित झालेल्या या तरुणाने औरंगाबाद जिल्ह्यातील युवतीशी थाटात विवाह करून आपला संसार मांडला आहे.
ललित साळवे सध्या माजलगाव पोलिस स्टेशनमध्ये कार्यरत असून त्याने रविवारी बौध्द विवाह पद्धतीने विवाह केला. माजलगाव येथे ललितचा विवाह सोहळा मोठ्या थाटात पार पडला. ललिताची नवरी ही बीएच्या तिसऱ्या वर्षाची विद्यार्थिनी असून ती औरंगाबादमध्ये शिक्षण घेत आहे. खूप मोठ्या संघर्षानंतर ललितचे सुखी संसाराचे स्वप्न पूर्ण झाले आहे. या अनोख्या सोहळ्याला ललिताच्या नातेवाईक मंडळींसह अनेकांनी हजेरी लावत नवदांपत्याला शुभेच्छा दिल्या.
बीड पोलिस दलातील कर्मचारी ललिता साळवे हिने शरीरातील हार्मोन्स बदलामुळे लिंगबदल करण्याची परवानगी मागितली होती. पोलिस दलातील क्लिष्ट प्रक्रिया पूर्ण करताना तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लिंगपरिवर्तनाला विशेष बाब म्हणून परवानगी दिली होती. महाराष्ट्र पोलिस दलातील ही पाहिलीच घटना होती. या सर्व प्रकरणामुळे ललिता साळवे राज्यासह देशभर चर्चेत आली होती. ललित साळवे हा माजलगाव तालुक्यातील राजेगांव येथे गुण्यागोविंदाने संसार करणार आहे. दरम्यान ललिताचा ललित असा कागदोपत्री देखील बदल करण्यात आला असून ललित संपूर्णपणे तंदरूस्त असल्याचा अहवाल वैद्यकीय खात्याने दिला होता. तब्बल एक वर्षानंतर रविवारी ललित साळवे याने नव्या आयुष्याची सुरुवात केली आहे.