Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Aurangabad Crime : विद्यार्थीनींना अश्लील चित्रफित दाखवणारा शिक्षक पोक्सौ गुन्ह्यात अटक, शाळेकडून शिक्षक बडतर्फ

Advertisements
Advertisements
Spread the love

औरंगाबाद – ७ जानेवारी रोजी शाळेतील सातवीच्या विद्यिर्थीनींना अश्लील चित्रफित दाखवणार्‍या शिक्षकावर अखेर एक महिन्यांनी सिडको पोलिस ठाण्यात पोक्सोचा गुन्हा दाखल करण्यात आला असून या आरोपी अटक करण्यात आल्याची माहिती पोलिस निरीक्षक अशोक गिरी यांनी दिली.
किरण परदेशी असे अटक आरोपीचे नाव आहे. वरील शाळेमधील मुख्याध्यापक आरोपी शिक्षकाला पाठीशी घालंत असल्याचे समजताच संतापलेल्या पालकांनी ठिय्या आंदोलन करंत निर्दशने केली. त्यामुळे संस्थाचालक अनिल सावे यांनी शिक्षकास बडतर्फ केल्याचा खुलासा “महानायक” शी बोलतांना केला. तसेच संस्थेच्या प्रशासनाकडून वरील प्रकरण उघडकीस आणल्याबद्दल कोणतीही शिस्तभंगाची कारवाई केली नसल्याचे म्हणाले.
वरील प्रकरणी अधिक माहिती अशी की, आरोपी किरण परदेशी हा १३ वर्षाच्या मुलींना कॅबीनमधे बोलावून मोबाईल मधील अश्लील चित्रे आणि चित्रफित दाखवत असे व मुलींना आपण मित्र असल्यामुळे  या गोष्टी घरच्यांना सांगू नये म्हणून बोलंत असे. त्यातील एका विद्यार्थीनीने या प्रकरणाची माहिती पालकांना दिल्यानंतर आरोपी किरण परदेशीवर पिडीतेच्या तक्रारीवरुन विनयभंग आणि पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला. पुढील तपास पोलिस निरीक्षक गिरी करंत आहेत.

Advertisements

आपलं सरकार

Click to listen highlighted text!