Aurangabad : रविवारी रंगणार मिलिंद मॅरेथॉन-२०२० चा थरार , रन फॉर चेंज साठी जय्यत तयारी

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या पीपल्स एज्युकेशन सोसायटी मुंबईच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त औरंगाबाद येथील मिलिंद कला महाविद्यायाच्या वतीने मिलिंद मॅरेथॉन-२०२० चे आयोजन करण्यात आले आहे. मिलिंद मॅरेथॉन स्पर्धेचा थरार रविवारी (दि.१२) सकाळी सहा वाजता रंगणार असून या स्पर्धेची मिलिंद महाविद्यालयाच्या परिसरात जोरदार तयारी सुरू आहे. महाविद्यालयाच्या समोरील मोकळया जागेवर भव्य असे मंच उभारण्यात येत आहे शिवाय रोडलगत असलेल्या तारफेन्सींगच्या खांबावर विविध रंगाचे ध्वज लावण्यात आले आहे.हे विविधारंगी ध्वज येणार्या जाणार्यांचे लक्ष वेधून घेत आहे.
पीईएसच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त वर्षभर विविध उपक्रम राबविण्यात येणार आहे. या उपक्रमापैकी एक मिलिंद मॅरेथॉन -२०२० रन फॉर चेंज हे ब्रिद घेऊन मिलिंद मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले आहे. या मिलिंद मॅरेथॉन -२०२० मध्ये जवळपास दोन ते अडिच हजार विद्याथी -विद्यार्थीनी महिला पुरूष सहभागी होणार आहे.मिलिंद महाविद्यालयाने क्रीडा प्रकारात पहिल्यादांच अशा स्वरूपाची मॅरेथॉन आयोजित करण्यात आली आहे.
या मॅरेथॉन मध्ये सहभागी होणार्या विजेत्या स्पर्धकांना रोख पारितोषिकासह ट्रॉफी,टी-शर्ट आणि प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. पीईएस शाररिक शिक्षण महाविद्यालयाचे पहिले प्राचार्य रामचंद्र भारसाखळे यांचे चिरंजीव तथा विद्यापीठाचे सिनेट सदस्य पंकज भारसाखळे यांच्या तर्फे लाखभर रूपयांची पारितोषिके दिली जाणार आहेत. या मिलिंद मॅरेथॉनला यशस्वी करण्यासाठी पीईएसच्या सर्व शाळा महाविद्यालयाच्यावतीने विशेष प्रयत्न करण्यात येत आहे.