Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Aurangabad Crime : चोरट्यांनी उन्हात बसलेल्या वृद्ध आजारी महिलेलाही सोडले नाही , ७५ हजाराचे मंगळसूत्र लांबविले…

Advertisements
Advertisements
Spread the love

औरंगाबाद – काल  (१०/१) सकाळी ११.३० सुमारास रविंद्रनगरात घराच्या अंगणात ऊन खात बसलेल्या वृध्देचे अडीच तोळ्याचे ७५ हजार रु.चे मंगळसूत्र मोटरसायकलवर आलेल्या दोघांनी हिसकावून पळ काढला. या प्रकरणी जवाहरनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ज्योती जीवन देसाई(७२) रा.रविंद्रनगर या आज सकाळी ११.३०च्या सुमारास घराच्या अंगणात थंडी कमी वाजावी म्हणून उन्हात बसल्या होत्या. सेवानिवृत्त प्राचार्य जीवन देसाई यांच्या त्या पत्नी आहेत.
तेवढ्यात मोटरसायकलवर आलेल्या दोन चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील अडीच तोळ्याचे मंगळसूत्र हिसकावले.ज्योती देसाई यांना अर्धांगवायूचा त्रास असल्यामुळे त्यांना काहीच हालचाल करता आली नाही.तसेच चोरट्यांचे वर्णनही त्या पोलिसांजवंळ करु शकल्या नाही. घटना घडली त्यावेळी घरामधे १०वर्षाचा नातू होता. तर पती जीवन देसाई स्नान करंत होते. पुढील तपास पोलिस निरीक्षक नरेंद्र जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय श्रध्दा वायदंडे व पीएसआय पाचोळे करंत आहेत

Advertisements

आपलं सरकार

Click to listen highlighted text!