औरंगाबाद -जालना मार्गावर कार -ऑटो रिक्षा अपघातात ५ ठार , तेराव्याला निघालेले संपूर्ण कुटुंबच संपले !!

औरंगाबाद-जालना मार्गावर झालेल्या भीषण अपघातात चौघे जागीच ठार झाले आहेत. मृतांमध्ये दोन लहान मुलांचाही समावेश आहे. भरधाव कारने एका ऑटोरिक्षाला धडक दिल्याने हा अपघात झाला. मृतांमध्ये दिनेश जाधव, रेणुका दिनेश जाधव, सोहम दिनेश जाधव आणि वंदना गणेश जाधव यांचा समावेश आहे. हे सर्व जण जालना जिल्ह्यातील होते.
चारही मृत ऑटोरिक्षात बसले होते. या अपघातात एकजण गंभीर जखमी झाला असून त्याला औरंगाबादमधील घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते परंतु उपचार चालू असतानाच त्याचेही निधन झाले. काल सकाळी औरंगाबाद-जालना मार्गावर अपघाताची हि घटना घडली. या अपघातात नातेवाईकाच्या तेराव्याच्या कार्यक्रमाला जाणाऱ्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. रिक्षाचा आणि कारचा समोरा-समोर भीषण अपघात होऊन रिक्षामधील सर्व ५ जण ठार झाले तर मृतांमध्ये ६ महिन्यांचा आणि ९ वर्षाच्या अशा दोन चिमुकल्यांसह दोन महिलांचा समावेश आहे. हा अपघात औरंगाबाद जालना महामार्गावरील शेकटा गावाजवळ घडला.
या अपघाताबाबत मिळालेल्या माहितीनुसार आज (बुधवार) सकाळी पावणे दहा वाजण्याच्या सुमारास जालना येथून निघालेला अपेरिक्षा औरंगाबाद दिशेकडे शेकटा शिवारातील अमृतसर पेट्रोलपंप समोरून जात होता. त्याच वेळी औरंगाबाद दिशेने भरधाव वेगाने येणारी कारदुभाजकावरून विरुद्ध दिशेला येऊन रिक्षावर वेगाने धडकली. या अपघातात रिक्षातील सर्व प्रवाशी चिरडले. या अपघातात चार जण जागीच ठार झाले. तर यात एक जण जखमी झाला असल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी पोलिसांना दिली.
औरंगाबादकडून जालऱ्यांच्या दिशेने निघालेली सुसाट वेगातील कार औरंगाबाद-जालना महामार्गावरील शेकटा गावाजवळ येताच रिक्षाला समोरासमोर धडकली. अपघात एवढा भीषण होता की दोन्ही वाहनांच्या समोरील बाजूंचा अक्षरशः चुराडा झाला. एकाच घरातील ५ जणांनी अशा प्रकारे प्राण गमावल्यामुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.
हा भीषण अपघात पाहून परिसरातील व्यापारी नागरिकांनी तातडीने ही माहिती पोलिसांना दिली. करमाड पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी धाव घेत दोन्ही कारमधील मृतांना बाहेर काढत रुग्णवाहिका आणि पोलीस वाहनातून औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात हलवले . वाहनांमध्ये आणि रस्त्यावर रक्ताचा सडा पडला होता. मृत हे जालना जिल्ह्यातील रहिवाशी आहे. एकाच परिवारातील ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.