Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

व्हिडिओकॉन : खा. धूत यांच्या बंगल्यावर कामगार सहकुटुंब धडकणार , मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडेही तक्रार

Spread the love

औरगाबाद  : व्हिडिओकॉन कंपनीचे मालक धुत बंधू यांच्या आर.टी.ओ. कार्यालय रेल्वे स्टेशन रोड , यांच्या बंगल्यावरसह  दि.२७/१२/२०१९ रोजी दुपारी १२.00 वाजता कुटुंब मोर्चा काढण्यात येणार आहे. याबाबत परवानगी मागण्यासाठीचा अर्ज व्हिडिओकॉन ग्रुप एम्प्लॉइज युनियनच्या वतीने पोलिस आयुक्त यांच्याकडे करण्यात आला आहे. त्याच बरोबर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडेही मुख्यमंत्री तक्रार निवारण पोर्टल वर करण्यात आली आहे.

व्हिडिओकॉन कंपनीचे मालक धूत बंधू यांनी 50 बँकांकडून 58730/- कोटी रुपये कर्ज घेवून त्यातून कंपनीसह अनेक बंगले खरेदी केले. त्यातीलच एक बंगला आर.टी.ओ. ऑफीसजवळ रेल्वे स्टेशन रोड येथील बंगला आहे. सदर बंगला हा जनतेच्या बँकेतील पैशांतून बांधलेला आहे. त्यामुळे त्यास खाजगी बंगला म्हणता येणार नाही. कंपनीच्या 340 कामगारांचे 119 दिवसांपासून उपोषण सुरू आहे. त्याकडे कंपनीमालक जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे व बंगल्यात मजा मारत आहे. कामगारांनी पावसाळ्यात उपोषण सुरू केले. आता हिवाळ्यात ही सुरूच आहे. ३४० कामगारांचा गेल्या 16 महिन्याचा एकूण आठ कोटी रुपये पेक्षा जास्त पगार बाकी आहे. हा पगार देण्याची नियत धूत बंधूंची नाही. यापूर्वी भिक मांगो आंदोलन, जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने, विभागीय आयुक्तांना निवेदन, गुलमंडीवरून धूत बंगल्यावर मोर्चा काढण्यापर्यंत केल्याबद्दल अटक, धूत बंगल्यावर मोर्चा व अटक, सन्माननीय मुख्यमंत्री यांना पोलिसांमार्फत निवेदन इत्यादी प्रयत्न झाले आहेत. तरी देखील धूत बंधू दुर्लक्ष करीत आहेत. म्हणून पुन्हा एकदा मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

या मागण्यांसाठी दि.२७/१२/२०१९ रोजी दुपारी १२.00 वाजता गुलमंडी ते पैठणगेट, क्रांतीचौक, उस्मानपुरा, रेल्वे स्टेशन, मार्गे धूत बंगला असा सह कुटुंब मोर्चा काढण्यास परवानगी द्यावी व लोकशाही पद्धतीने, संविधानाने दिलेल्या अधिकाराचा वापर करू द्यावा ही नम्र विनंती पोलिस आयुक्त यांना करण्यात आली आहे. यापूर्वी एकदा मोर्चा काढण्याची परवानगी पोलिसांनी दिली नव्हती म्हणून कामगारांनी पोलिसांना न सांगता अचानक धडक धूत बंगला गाठून मोर्चा काढला होता. यापुढे मोर्चा काढण्या पूर्वी आम्हाला सांगा असे पोलिसांनी सांगितल्यामुळे यावेळी पोलिसांना अर्ज करण्यात आली आहे. पब्लिक मनी मधून बांधण्यात आलेल्या बंगल्यावर मोर्चा काढायला पोलिस परवानगी देतात का ? ५० बँकांकडून ५८७३० कोटी रुपयांचे कर्ज घेऊन चुना लावणारे सहा गुन्हे दाखल असणाऱ्या धूत बंधूंना अटक करतात का ? की पुन्हा पगाराची मागणी करणाऱ्या कामगारांना अटक करून दडपशाही करतात हे पाहावे लागेल असे प्रसिध्दी पत्रकात नमूद करण्यात आले आहे. यावर गजानन बंडु खंदारे
शेख कय्युम शेख रज्जाक, सुनिल सुभाष सिरसाठ, अ‍ॅड. अभय टाकसाळ, चशारेख खान लतीफ खान, सारंग त्र्यंबक भागवत, साईनाथ कुशीनाथ ठेंगडे,  सय्यद अर्शद सय्यद अहेमद अली, संजय तात्याराव सोनवणे, शेख सलीम शेख नबी,  मिलिंद श्रावण चव्हाण,  राजु भास्कर भालेराव, बाबासाहेब कचरू म्हस्के,  सलीमोद्दीन कमरोद्दीन, ज्ञानोबा माधवराव खंदारे, शेख नसीर शेख खुदबोद्दीन, सुनिल सुभाषराव शिरसाठ- कोषाध्यक्ष, मनोज कौतिकराव पवार,  उत्तम मुरलीधर वाघमारे ,  लालाखान मुमताज खान,  भाऊसाहेब कचरू भालेराव ई च्या सह्या आहेत.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!