Aurangabad : एक विशेष प्रेसनोट आणि गोंधळात गोंधळ , आयुक्तांनी केला खुलासा औरंगाबाद शहर शांत शहर , कुठेही १४४ कलम नाही

औरंगाबादच्या पोलीस उपयुक्त मुख्यालय मीना मकवाना यांनी एक विशेष प्रेसनोट काढून त्यांच्या विशेष अधिकारात फौजदारी प्रक्रिया संहिता सन १९७३ चे कलम १४४ (१) व (३) अन्वये मनाई आदेश काढल्याने शहरात आश्चर्य व्यक्त करण्यात आले . विशेष म्हणजे असे कलम जारी करण्यासाठी कुठलीही अनुचित घटना शहरात घडली नाही तरीही उपयुक्त मुख्यालय यांनी असे आदेश जारी केल्यामुळे संभ्रम निर्माण झाला परिणामी या प्रकरणात थेट आयुक्तांनाच हे सगळे गैर समजुतीतून घडले असल्याचे सांगावे लागले.
पोलिस उपायुक्त मीना मकवाना या औरंगाबादेत येण्यापूर्वी मुंबईत राज्यपाल सुरक्षा व्यवस्थेत कार्यरत होत्या.
शहरात आणि मुख्यालयातील अधिकाऱ्यांमध्ये आज याच विषयावरून चर्चा केली जात असल्याने हि बाब पोलीस आयुक्तांच्या निदर्शनास येताच त्यांनी तात्काळ खुलासा काढून औरन्गाबाद शहर हे शांततेचे शहर असून शहरातील कुठल्याही भागात तणावाची परिस्थिती नसल्याने केवळ गैरसमजुतीतून तसे पत्रक काढण्यात आल्याचे पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी म्हटले आहे.
दरम्यान पोलिस उपायुक्त मीना मकवाना यांनी जमावबंदीसाठी जारी केलेल्या आदेशाखाली मुंबई पोलिस अॅक्ट च्या तरतुदी लिहून प्रसिध्द केले. होते ज्या मधे शहरातील घरमालकांचे किरायेदार आणि त्यांची माहिती, भंगार व्यापार्यांची माहिती तसेच हाॅटेल व्यावसायिक, सिम कार्ड विक्रेते, औद्योगिक वसाहती मधे मनुष्य बळ पुरवणारे यांची माहिती असते.
या चुकीच्या आदेशामुळे काल शहरात एम.आय.एम. ने काढलेल्या मोर्चामुळे बर्याच ठिकाणी जमावबंदीचे आदेश मोडल्याची माहिती प्रसिध्द झाली. या विशेष प्रेसनोट मुळे उडालेला गोंधळ लक्षात घेता पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांना पुन्हा नव्याने नोटीस काढून खुलासा करावा लागला.की जमावबंदीचे आदेश जारी केले नव्हते. जे काही झाले ते गैरसमजुतीतून झाले . औरंगाबाद शहर पूर्णतः सुरक्षित आणि शांत शहर आहे. शहरातील सर्व नागरिकांबरोबर शहरात येणारे पर्यटक आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत.