Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Aurangabad : गॅसच्या ट्रकने दुचाकीस्वार युवकास चिरडले , आंबेडकरनगर चौकात अपघात

Spread the love

औरंंंगाबाद : भरधाव वेगाने जात असलेल्या गॅस सिलेंडरने भरलेल्या ट्रकने दुचाकीस्वारास चिरडले. हा अपघात शनिवारी (दि.२१) दुपारी सव्वाएक वाजेच्या सुमारास सिडको बसस्थानक चौक ते हर्सुल टी पॉईन्ट चौकादरम्यान असलेल्या आंबेडकरनगर चौकात घडला. अपघातानंतर रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. योगेश जनार्दन गाडवे (वय ३४, रा.संभाजी कॉलनी, जाधववाडी) असे अपघातात ठार झालेल्या युवकाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत योगेश गाडवे हा आपला भाऊ राजू जनार्दन गाडवे (रा.संभाजी कॉलनी, जाधववाडी) याच्यासोबत दुचाकी क्रमांक (एमएच-२०-एफबी-०५०७) वरून सिडको बसस्थानक चौकातून जाधववाडीकडे जात होता. त्यावेळी पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या गॅस सिलेंडर भरलेल्या ट्रकने गाडवे यांच्या दुचाकीस आंबेडकरनगर चौकात जोराची धडक दिली. दुचाकीवर पाठीमागे बसलेला योगेश गाडवे याच्या अंगावरून ट्रकचे चाक गेल्याने तो रस्त्यावर रक्ताच्या थारोळ्यात पडला होता.
दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच सिडको पोलिस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या योगेश गाडवे याला बेशुध्दावस्थेत उपचारासाठी घाटीत दाखल केले असता डॉक्टरांनी त्यास तपासून मयत घोषीत केले. याप्रकरणी सिडको पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!