Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

तुम्हाला मोबाइल नंबर पोर्ट करायचाय ? मग हे वाचाच…

Spread the love

तुम्हाला मोबाइल नंबर पोर्ट करायचा असेल तर आता आणखी सोपं झालं आहे. टेलिकॉम रेग्युलेटरी ऑथॉरिटी ऑफ इंडिया म्हणजेच (TRAI)ने मोबाइल नंबर पोर्टेबिलिटीचे नवे नियम जारी केले आहेत. नव्या नियमांनुसार, आता ग्राहक तीन दिवसांत आपला नंबर पोर्ट करू शकतील. हे नियम १६ डिसेंबरपासून लागू होणार आहेत.

मोबाइल नंबर पोर्टेबिलिटी आहे काय?

तुम्हाला जर एका मोबाइल कंपनीची सेवा बदलून दुसऱ्या मोबाइल कंपनीची सेवा घ्यायची असेल तर मोबाइल नंबर पोर्टेबिलिटीचा उपयोग होतो. कंपनी बदलली तरी तुमचा मोबाइल नंबर मात्र तोच ठेवता येतो. सध्या नंबर पोर्ट करण्यासाठी ७  दिवसांचा अवधी लागतो. आता हाच अवधी 3 दिवसांचा असेल. मोबाइल नंबर पोर्टेबिलिटीमध्ये यूजरला पोर्टिंग कोड जनरेट करावा लागतो. या यूनिक कोडमुळे नंबर पोर्ट करता येतो.

टेलिकॉम ऑपरेटर्सना मोबाइल नंबर पोर्टेबिलिटी ट्रॅन्जॅक्शन साठी पैसे भरावे लागतात. ट्रायने ठरवलेली नवी फी आता ५.७४ रुपये झालीय. सध्या प्रत्येक ग्राहकासाठी टेलिकॉम ऑपरेटरला १९ रुपये द्यावे लागतात. एखाद्या कंपनीची सेवा आवडत नसेल तर ग्राहकाकडे दुसऱ्या कंपनीचा पर्याय आहे. त्यातच मोबाइल नंबर पोर्ट होणार असल्याने हे करणं शक्य होणार आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!