Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Aurangabad cyber crime : बँक अधिकारी महिलेलाच घातला ५३ हजाराला गंडा

Spread the love

आॅनलाईन शॉपींग संदर्भात कस्टमर केअरशी संपर्क साधून अ‍ॅप डाऊन करण्यास सांगत बँक अधिकारी महिलेचा मोबाईल हॅक करुन त्यातील माहिती मिळवत भामट्याने खात्यातील ५३ हजार ४७१ रुपये लांबविले. हा प्रकार २२ नोव्हेंबर रोजी सकाळी पावणेबाराच्या सुमारास घडला.

स्टेट बँक आॅफ इंडियामध्ये कार्यरत असलेल्या गायत्री श्रीरंग पळणीटकर (४५, रा. प्राईड इनीगमा, गारखेडा परिसर) यांनी सकाळी पावणेबाराच्या सुमारास आॅनलाईन शॉपींगसंदर्भात क्लब फॅक्टरी कस्टमर केअरच्या क्रमांकावर संपर्क साधला होता. त्याच्याशी झालेल्या संभाषणानंतर समोरुन बोलणा-या व्यक्तिने एनी डेस्क नावाचे अ‍ॅप डाऊनलोड करण्यास सांगितले. हे अ‍ॅप डाऊनलोड करताना गायत्री यांचा मोबाईल हॅक करण्यात आला. यावेळी समोरील व्यक्त्निे काहीही न सांगता त्यांच्या क्रेडिट कार्डच्या खात्यातील ५३ हजार ४७१ रुपयांची रक्कम नो ब्रोकर, ओला कॅब, पे यू पे मी, ट्रान्झेक्शन अ‍ॅनलीस्ट आणि यूएई एक्सचेंजच्या नावाखाली स्वत:च्या खात्यात वळती करुन घेतली. याबाबतचे मॅसेज व ओटीपी क्रमांक धडाधड गायत्री यांच्या मोबाईलवर आदळले. त्या क्रेडिट कार्ड ब्लॉक करेपर्यंत ही रक्कम भामट्याच्या खात्यात जमा झाली होती. हा प्रकार घडल्यानंतर गुरुवारी गायत्री यांनी जवाहरनगर पोलिस ठाणे गाठत तक्रार दिली. याप्रकरणाचा पुढील तपास निरीक्षक नरेंद्र जाधव करत आहेत.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!