Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Aurangabad Crime : डेअरी प्रकल्पाचे आमिष दाखवून उद्योगपती महिलेला भामट्याने घातला ७९ लाखांचा गंडा

Spread the love

औरंंंगाबाद : मोठा डेअरी प्रकल्प उभारण्यासाठी मोठे रक्कमेचे कर्ज प्रकरण मंजूर करुन देतो असे आमिष दाखवून भामट्याने उद्योगपती असलेल्या तक्रारदार ५६ वर्षीय महिलेस ७९ लाख १२ हजार रुपयांचा गंडा घातला. महिलेला गंडविण्यात आल्याचा प्रकार ऑक्टोबर २००४ ते मे २००९ या काळात घडला असल्याची माहिती सिडको पोलिस ठाण्याच्या सुत्रांनी दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उपेंद्र गुणवंतराव मुळे (रा. औरंगाबाद) असे महिलेला गंडा घालणाNया भामट्याचे नाव आहे. तक्रारदार महिलेने अमेय डेअरी प्रा. लि. या फर्मच्या नावाने आदर्श नागरी महिला बँकेकडून कर्ज घेतले होते. या कर्ज प्रकरणात तडजोड करुन तुम्ही एकरकमी कर्जाची परतपेâड करा, तुम्हाला शासनाच्या दुग्ध विकास महामंडळाकडून मोठा डेअरी प्रकल्प उभारण्यासाठी मोठ्या रक्कमेचे कर्ज मंजूर करुन देतो असे आमिष उपेंद्र मुळे याने तक्रारदार महिलेस दाखविले होते. तसेच महिलेचा विश्वास संपादन केला होता.

दरम्यान, विविध कारणे सांगून उपेंद्र मुळे याने तक्रारदार महिलेकडून ७९ लाख १२ हजार रुपये वेळोवेळी करुन ऑक्टोबर २००४ ते मे २००९ या काळात घेतले होते. पैसे देवूनही काम होत नसल्याने तक्रारदार महिलेने पैशासाठी तकादा लावल्यावर उपेंद्र मुळे याने आपला फोन बंद करुन टाकला होता. आपली फसवणूक झाली असल्याचे लक्षात आल्यावर तक्रारदार महिलेने दिलेल्या तक्रारीवरुन उपेंद्र मुळे याच्याविरुध्द सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास उपनिरीक्षक प्रविण पाटील करीत आहेत.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!