aurangabad crime : जिन्सी परिसरातील दोन जुगार अड्डे पोलिसांकडून उध्वस्त, १० जुगारी गजाआड, १ लाख १९ हजाराचा मुद्देमाल जप्त

औरंंंगाबाद : जिन्सी परिसरातील संजयनगर व बायजीपुरा भागात सुरू असलेल्या जुगार अड्यावर जिन्सी पोलिस ठाण्याच्या डीबी पथकाने मंगळवारी रात्री उशिरा छापा मारला. या कारवाईत पोलिसांनी १० जुगा-यांना गजाआड करीत त्यांच्या ताब्यातून १ लाख १८ हजार ९०० रूपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला असल्याची माहिती जिन्सी पोलिस ठाण्याचे निरीक्षक व्यंकटेश केंद्रे यांनी बुधवारी (दि.२७) दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेख सलमान शेख बद्रोद्दीन (वय २५,रा. मुंबई घाटकोपर पाकसाईड अमृत नगर ह. मु इंदीरा नगर बायजीपुरा), कदीर खान शब्बीर खान (वय २७, रा. बायजीपुरा), शाहरुख खान रऊफ खान (वय २३, रा. इंदीरानगर बायजीपुरा), हैदर खान जफर खान (वय ३०, रा. संजयनगर), कृणाल श्रीधर नरवडे (वय २०, रा. इंदिरा नगर ), सय्यद फय्याज सय्यद मोईनोद्दीन (वय २७, रा. संजयनगर ), शेख कामील शेख लतीफ (वय ३०), शेख जावेद शेख इस्माईल (वय ३४), शेख इरफान शेख हबीब (वय २९) सर्व रा. बायजीपुरा, सादीक शेख नसीर शेख (वय २७,रा. कैलास नगर) अशी अटक केलेज्या जुगा-यांची नावे आहेत. या जुगा-यांच्या ताब्यातून पोलिसांनी जुगाराचे साहित्य, मोबाईल, रोख रक्कम असा एवूâण १ लाख १८ हजार ९०० रूपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
पोलिस उपायुक्त डॉ. राहुल खाडे, सिडकोचे सहायक आयुक्त निशीकांत भुजबळ, यांच्या मार्गदर्शनाखाली जिन्सी पोलिस ठाण्याचे निरीक्षक व्यंकटेश केंद्रे, उपनिरीक्षक दत्ता शेळके, सहाय्यक फौजदार रफी शेख, धनेधर, जमादार हारुण शेख, संजय रोकडे, सुजाऊद्दीन सिद्दीकी, संजय गावंडे, केशव चौथे, गणेश नागरे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.