Aurangabad Crime : विवाहितेची आत्महत्या,पतीला ठोकल्या बेड्या

Advertisements
Advertisements
Spread the love

औरंंंगाबाद : हर्सुलच्या फुलेनगर येथील वीस वर्षीय विवाहितेने राहत्या घरात ओढणीने गळफास घेवून आत्महत्या केली. विवाहितेच्या आत्महत्येप्रकरणी तिच्या पतीला अटक करण्यात आली आहे.मयत विवाहितेच्या आईच्या तक्रारीवरून पतीसह चार जणांविरूध्द हर्सुल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेख मुस्कान शेख मेहराज (वय १८, रा. फुलेनगर, हर्सुल) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,शेख मुस्कान शेख मेहराज हिने राहत्या घरातील छताच्या पाईपला ओढणी बांधुन गळफास घेतला. ही बाब उघडकीस आल्यानंतर मुस्कान हिला घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु तिला डॉक्टरांनी मृत घोषित केले. या प्रकरणी मुस्कान हिची आई शेख अनिसा यांनी तक्रार दिली. त्यानुसार मुस्कान व शेख मेहराज यांचा आठ महिण्यांपुर्वी विवाह झाला होता. मुस्कानला हुंड्यापोटी माहेरहुन एक लाख रुपये आणण्याची मागणी केली जात होती. यावरुनच पती, मेहराज, सासु, सासरा, ननंद यांनी तिचा छळ सुरु होता. ही बाब मुस्कानने आपणास सांगितली होती, असे तिची आई शेख अनिसा यांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे.

Advertisements

आपलं सरकार

Click to listen highlighted text!