Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

मोठी बातमी : थेट दिल्लीवरून : पवार -मोदींच्या एकांतातील भेटीमुळे गूढ वाढले , सोनिया गांधी यांचीही नाराजी….

Spread the love

मोदींच्या आणि आपल्या भेटीविषयी शरद पवारांनी खुलासा केला असला तरी , शेतकऱ्यांच्या समस्यांसाठीच शरद पवारांना मोदींची भेट घायची होती तर ते शिष्टमंडळाने का गेले नाहीत. शरद पवार आणि त्यांची राष्ट्रवादी युपीएचा घटक पक्ष आहेत . म्हणून प्रश्न फक्त महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या समस्यांच्या चर्चेचाच असता तर युपीए सोडा पवारांनी आपल्या पक्षातील महत्वाच्या नेत्यांनाही सोबत नेले नाही याचा अर्थ पवारांना त्यांच्याशी एकट्यात का चर्चा करायची होती असा प्रश्न दिल्लीतील राजकीय वर्तुळात वर्तुळात विचारला जात आहे . त्यांच्या या भेटीमुळे सोनिया गांधी स्वतः नाराज झाल्या असल्याचे सांगण्यात येत आहे परिणामी महाराष्ट्रातील सत्तापेचावरील धुके अधिकच दाट झाले असल्याचे दिसत आहे.

हे खरे आहे कि , शरद पवारच्या भूमिका कधीही स्पष्ट नसतात त्यामुळे त्यांच्या प्रत्येक कृतीकडे महाराष्ट्राला आणि राजकारण्यांना कायम संशयाने पाहण्याची सवय झाली आहे . आज शरद पवार चर्चेच्या झोतात आले ते मोदी आणि त्यांच्यातील भेटीमुळे. पवार आणि मोदी यांच्या भेटीला महाराष्ट्राच्या सत्ता पेचाची किनार असल्यामुळे राजकीय वातावरण तापलं आहे. शरद पवारांच्या खेळीची कल्पना कुणालाच लागत नाही असं दिल्लीच्या वर्तुळात म्हटलं जातं त्यामुळे या भेटीकडे संशयाने पाहिलं जातंय.

या आधीच  पंतप्रधानांनी राज्यसभेत बोलताना राष्ट्रवादीच्या भूमिकेचं कौतुक केल्यामुळे सरावाच्या भुवया वर गेल्या होत्या. परंतु आपण गेल्या ५२ वर्षात प्रश्न विचारताना कधीही आपल्या खुर्चीवरून उठून वेलमध्ये गेलो नाही , हाच धागा धरून पंतप्रधान तसे बोलले असतील म्हणून पवार मनोमन आनंदीही झाले असतील पण याचे अनेक अर्थ लावले जात असतानाच आज पवार आणि मोदींची विशेष भेट झालाय आणि राजकीय वर्तुळात वेगळ्याच चर्चांना उधाण आले. दरम्यान  काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्षा सोनिया गांधी या मोदी-पवार भेटीवर नाराज असल्याची माहिती पुढे येत आहे त्यामुळे शिवसेना -राष्ट्रवादीच्या सत्तास्थापनेचे मुसळ केरात जाते कि काय ? असा प्रश्न उपस्थित झाला आहे .

त्याचे झाले असे कि , संसदेतून बाहेर पडताना या भेटीवर जेव्हा सोनिया गांधी यांना या भेटी विषयी विचारण्यात आलं तेव्हा त्यांनी फक्त “नो कॉमेंट्स” एवढचं उत्तर दिलंआणि त्या पुढे निघून गेल्या. त्यावरूनही त्या नाराज असल्याचे संकेत मिळतात असं बोललं जातंय. पवारांनी पंतप्रधानांची ‘चुकीच्या वेळेवर’ भेट घेतली असं काँग्रेसला वाटतंय. या भेटीचा आणि नाराजीचा परिणाम काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या चर्चेवर तर होणार नाही ना ? असा प्रश्न कार्यकर्त्यांसमोर निर्माण झाला आहे.

एका बाजूला राज्यातील सत्ता स्थापनेबाबत राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्यात बैठक होणार असताना त्याआधी आज संसदेत दुपारी साडेबाराच्या सुमारास पवारांनी मोदींची भेट घेतली. या दोन्ही नेत्यांमध्ये नेमक्या कोणत्या विषयावर चर्चा होणार याबद्दल संपूर्ण राज्याला उत्सुकता लागली होती. विशेषत: गेल्या काही दिवसात राज्यात शिवमहाआघाडीचे सरकार येणार अशी चर्चा सुरु असताना पवारांच्या या भेटीला प्रचंड महत्त्व आले होते. राज्यात भाजप आणि शिवसेना यांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतल्यापासून सर्व घडामोडींचे केंद्र शरद पवारच राहिले आहेत.

संजय राऊत म्हणतात त्यांच्या भेटीत राजकारण नाही…

महाराष्ट्रातल्या राजकीय अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर या भेटीला महत्त्व प्राप्त झालंय. तर मोदी-पवार भेटीनंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे सुद्धा नरेंद्र मोदींना भेटले या सगळ्या घडामोडींमुळे राजधानीतलं वातावरण चांगलंच तापले आहे. त्यातच आज काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक होतेय. पवार मोदी भेटीमुळे शिवसेनेची धाकधूक वाढलीय. या भेटीवर आपली प्रतिक्रिया देताना संजय राऊत म्हणाले, शरद पवार मोदींना भेटले यात काहीही राजकारण नाही. राजकारणाशिवायही अनेक कामं असतात. पवार पंतप्रधानांना भेटू शकतात. राष्ट्रवादी आणि भाजप एकत्र येणार का? या प्रश्नावर राऊत म्हणाले, ते भाजपलाच विचारा, मात्र शिवसेनेच्या नेतृत्वाखाली लवकरच सरकार अस्तित्वात येणार आहे. अमित शहा मोदींना भेटले यात काहीही नवं नाही. गृहमंत्र्यांना पंतप्रधानांना भेटावच लागतं.

 

आपलं सरकार

Click to listen highlighted text!