Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

मोठी बातमी : अखेर शरद पवार -सोनिया गांधी यांची उद्याची दिल्लीतील बैठक लांबणीवर , शिवसेनेचे शिवतीर्थावरील शपथविधीचे स्वप्न तूर्त मावळले

Spread the love

राज्यात महाशिवआघाडीचे सरकार येणार असल्याच्या चर्चा जोरात चालू असतानाच सत्ता स्थापनेचा हा तिढा सोडवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यात भेट होणे आवश्यक असल्याचे सांगण्यात येत होते . उद्या हि बैठक होणार असल्याचेही सांगण्यात येत होते परंतु , त्यांच्यात  उद्या कोणतीही बैठक होणार नसल्याची माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे दिवसेंदिवस शिवसेनेचे मुख्यमंत्री बनविण्याचे स्वप्न साकार होण्यास विलंब होत आहे.

दरम्यान शिवसेनेचा शिवतीर्थावरील शपथविधी होणार नसल्याचे संकेत महानायक ऑनलाईनने या पूर्वीच आपल्या वृत्तातून दिले होते.

काँग्रेसचे वरिष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी आधीच स्पष्ट केले आहे कि , फक्त काँग्रेस सत्ता स्थापनेबाबत काहीही  ठरवू शकत नाही. शरद पवार आणि सोनिया गांधी यांच्यात चर्चा झाल्यानंतरच  पुढची वाटचाल ठरेल. यावर रविवारी शरद पवार आणि सोनिया गांधी यांच्यात बैठक होणार असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. पण आता ही बैठक लांबणीवर गेली आहे.

विशेष म्हणजे उद्या पुण्यात शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोअर कमिटीची दुपारी ४ वाजता बैठक होणार आहे. या बैठकीला राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, छगन भुजबळ, जयंत पाटील हे हजर राहणार आहे. गेल्या काही दिवसांपासून शिवसेना आणि काँग्रेस नेत्यांसोबत सरकार स्थापन करण्याबद्दल बैठका पार पडल्या. त्यानंतर राष्ट्रवादीची आज स्वतंत्र बैठक होत आहे.

दरम्यान, गुरुवारी राज्यातील तीन पक्षाची एकत्र बैठक होऊन त्यात किमान समान कार्यक्रमावर चर्चा झाली. त्यानंतर आता तीन पक्षातील वरिष्ठ नेते एकत्र मिळून चर्चा करतील. याआधी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यात मध्यावधी निवडणुका होणार नाहीत असं म्हटलं होतं. तसेच महाशिवआघाडीचं सरकार येईल आणि ते ५ वर्षांचा कार्यकाळ पूर्ण  करेल असेही मह्टलं होतं.

चर्चा अशीही होती कि , मंत्रिपदाबाबत शिवसेनेने  १६-१४-१२ च्या फॉर्म्युला मांडला आहे. तर तीनही पक्षांना समान म्हणजेच १४-१४-१४ अशा फॉर्म्युल्यासाठी काँग्रेस आग्रही  आहे. तसेच शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यात मुख्यमंत्रिपद अडीच अडीच वर्षांसाठी असेल अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. राज्यात भाजप-शिवसेना युतीला स्पष्ट बहुमत मिळूनही केवळ मुख्यमंत्रिपदाच्या वादामुळे या दोन्ही पक्षांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला. त्याच मुख्यमंत्रिपदावरून आता महाशिवआघाडीतही मतभेद सुरू आहेत. राष्ट्रवादीने शिवसेनेकडून मुख्यमंत्रिपदाबाबत ५०-५० च्या फॉर्म्युल्याची मागणी केली आहे. मात्र पूर्ण पाच वर्ष आमचाच मुख्यमंत्री हवा, असं शिवसेनेचं म्हणणं आहे. त्यामुळे या संभाव्य आघाडीत पेच निर्माण झाला असल्याची आहे.

शिवसेनेसोबत सत्तेत सहभागी होण्यापूर्वी किमान समान कार्यक्रमावर चर्चा करण्याचा आग्रह दोन्ही काँग्रेसनं धरला होता. त्यासाठी खास दिल्लीहून काँग्रेसचे वरिष्ठ नेते अहमद पटले आणि मल्लिकार्जून खरगे मुंबईत आले होते. त्यानंतर या नव्या राजकीय समीकरणाला वेग आला होता. मुंबईत शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या नेत्यांमध्ये गेल्या तीन दिवसांपासून बैठकांचं सत्र सुरू होतं. या बैठकीमध्ये सरकार स्थापन झाल्यावर समसमान कार्यक्रमाचा मसुदा तयार करण्यात आल्याचे सांगण्यात आले होते. मात्र दिल्लीहून आलेल्या बातम्यांमध्ये सोनिया गांधी यांनी काँग्रेस नेत्यांवर य सर्व प्रकारामुळे नाराजी व्यक्त केली असल्याचे वृत्त आहे.

दरम्यान, उद्या रविवारी नवी दिल्लीत शरद पवार आणि सोनिया गांधी यांची महत्त्वाची बैठक  पुढे ढकलण्यात  आल्यामुळे आता हि बैठक केंव्हा होणार त्यावरच महा शिव आघाडीचे भवितवय अवलंबून आहे त्याशिवाय हा सेना -काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा हा गाडा पुढे जाणार नाही ,  हे मात्र खरे .

आपलं सरकार

Click to listen highlighted text!