मराठवाडा वृत्तपत्र छायाचित्रकार संघटनेच्या अध्यक्षपदी बाळू देशमुख

औरंंंगाबाद : मराठवाडा वृत्तपत्र छायाचित्रकार संघटनेच्या अध्यक्षपदी बाळु देशमुख यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.
औरंगाबाद शहरातील विविध वृत्तपत्रांचे छायाचित्रकार एकत्र येत शासकीय नोंदणीकृत (र.जि.नं.एडब्लयुबी/३२३२/२०१९) मराठवाडा वृत्तपत्र छायाचित्रकार संघटनेची स्थापना करण्यात आली आहे. या संघटनेच्या माध्यमातून जिल्ह्यातील सर्व वृत्तपत्र छायाचित्रकार यांच्या न्याय-हक्कासाठी कार्य करण्याचा मानस डोळ्यासमोर ठेवून ही संघटना स्थापन करण्यात आली आहे. या संघटनेच्या अध्यक्षपदी बाळु देशमुख, उपाध्यक्ष सावेश जाधव, सचिवपदी श्याम पलाये, कोषाध्यक्ष सचिन उबाळे तर सदस्य रवि खंडाळकर, माजेद खान, सचिन लहाने, स्नेहिल साखरे, आतिष वानखेडे, दीपक पवार, मच्छिंद्र नागरे, इरफान खान यांची निवड करण्यात आली आहे.