Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

मंदिराच्या पुजाऱ्याचा दगडाने ठेचून खून , दानपेट्या पळविल्या

Spread the love

केज तालुक्यातील दहिफळ वडमाऊली येथील वडजुआई देवी मंदिरात पुजाऱ्याचा दगडाने ठेचून खून करून चोरट्यांनी दानपेट्या पळवल्या. रविवारी सकाळी ही धक्कादायक घटना उघडकीस आली. रामलिंग ठोंबरे (वय-५५) असे मृत पुजाऱ्याचे नाव आहे. पोलिस घटनास्थळी पोहोचले आहेत. चोरट्यांचा शोध घेण्यासाठी पोलिस पथक रवाना झाले आहे.

मिळालेली माहिती अशी की, मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी मंदिरात प्रवेश करून पुजारी रामलिंग ठोंबरे यांच्या डोक्यात दगड घालून त्यांची हत्या केली. दानपेट्या फोडून देणगीची रक्कम चोरी केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. चोरट्यांनी देवीचे दागिनेही पळवून नेले आहेत. तसेच दानपेट्या फोडून त्यातील रक्कम घेऊन आरोपी पसार झाले आहेत. पुजारी रामलिंग ठोंबरे हे दहिफळ वडमाऊली देवीच्या मंदिरात मागील 25 वर्षांपासून सेवा करत होते. अमावस्या आणि पोर्णिमेला दहिफळ वडमाऊली येथील वडजुआई देवी मंदिरात भाविकांची मोठी गर्दी होते. त्यामुळे मंदिरातील दानपेटीत मोठ्याप्रमाणात देणगी येते. दानपेट्यांमधील मोठी रक्कम चोरली गेल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!