Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

चंद्रकांत पाटील यांनीच बंडखोरी करायला सांगितले , खा . संजय मंडलिक यांचा पलटवार

Advertisements
Advertisements
Spread the love

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीच बंडखोरी करायला सांगितली, शिवसेनेला कमी जागा याव्यात हा त्यांचा यामागचा उद्देश होता असा पलटवार  शिवसेना खासदार संजय मंडलिक यांनी केला आहे. कोल्हापूर जिल्ह्यात युतीची जी पिछेहाट झाली त्याला खासदार संजय मंडलिक जबाबदार आहेत असा आरोप चंद्रकांत पाटील यांनी केला होता. याच आरोपाला आता संजय मंडलिक यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. मात्र चंद्रकांत पाटील यांच्याकडे त्यांच्या पक्षाने मोठी जबाबदारी दिली. अशात त्यांना इथल्या पराभवाचं खापर जर चार महिन्यापूर्वी खासदार झालेल्या माझ्यावर फोडायचं असेल तर काय बोलायचं असा प्रतिप्रश्नही मंडलिक यांनी केला आहे.

Advertisements

एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. शिवसेनेला कोल्हापुरात भाजपापेक्षा जास्त जागा मिळाल्या म्हणून चंद्रकांत पाटील यांनीच बंडखोरी यांनी सांगितली असा आरोपही संजय मंडलिक यांनी केला. एवढंच नाही तर चंद्रकांत पाटील जर जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत तर पक्षातली बंडखोरी त्यांनी का थांबवली नाही? ती होऊ का दिली? याचा विचार केला तर संशय घ्यायला जागा नक्कीच आहे असंही मंडलिक यांनी म्हटलं आहे.

Advertisements
Advertisements

मंडलिक पुढे म्हणाले कि , आलेल्या निवडणूक निकालाबाबत सगळ्याच पक्षांनी आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे . प्रत्येक निवडणुकीचे संदर्भ लक्षात घेऊन मतदारराजा त्याप्रमाणे विचार करतो आहे ही बाब लक्षात घ्यायला हवी. लोकसभेच्या वेळी संदर्भ वेगळे होते. आता विधानसभेच्या वेळी संदर्भ वेगळे होते असंही मंडलिक यांनी म्हटलं आहे. एवढंच नाही तर चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या आरोपांमध्ये काहीही तथ्य नाही असंही मंडलिक यांनी स्पष्ट केलं. कोल्हापूर जिल्ह्यात संजय मंडलिक यांनी सोयीचं राजकारण केलं त्यामुळे भाजपा आणि शिवसेनेचा पराभव झाला असा आरोप चंद्रकांत पाटील यांनी केला होता. याच आरोपाला संजय मंडलिक यांनी केला आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!