Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Ahmadnagar : नगरच्या सुपुत्राला दहशतवाद्यांशी लढताना वीरमरण

Spread the love

भारत-पाक सीमेवर पाकिस्तानच्या लष्कराकडून झालेल्या अतिरेक्यांच्या गोळीबारात नायब सुभेदार सुनील रावसाहेब वाल्टे शहीद झाले आहेत. भारत-पाकिस्तान सीमेवर नौशेरा सेक्टरमध्ये पाकिस्तानी लष्कराकडून गोळीबार सुरू असताना त्याला चोख प्रत्युत्तर देत असताना या महाराष्ट्राच्या पुत्राला वीरमरण आले. त्यांचे वय ४० असून मूळचे अहमदनगरमधील दहिगाव गावचे निवासी होते. त्यांच्या मागे पत्नी आई, वडील, मुलगी आणि मुलगा असे त्यांचे कुटुंब आहे. जम्मू-काश्मीरमधील राजौरी जिल्ह्यात भारतीय हद्दीत घुसखोर झालेल्या दहशतवाद्यांचा शोध आजही सुरू आहे.

जम्मू-काश्मीरमधील राजौरी येथे पाकिस्तानी सैनिकांनी केलेल्या गोळीबाराला प्रत्युत्तर देताना कोपरगाव तालुक्यातील दहीगावचे जवान सुनील रावसाहेब वाल्टे यांना वीरमरण आलं आहे. ४० वर्षीय वाल्टे हे लष्करात नायब सुभेदार होते.

नायब सुभेदार सुनील वाल्टे यांनी सेवाकाळ पूर्ण झाल्यानंतर ५ वर्षांची मुदत वाढवून घेतली होती. पुढच्या काही दिवसांमध्येच ते सेवानिवृत्त होणार होते. मात्र या झालेल्या गोळीबारात त्यांनी आपले प्राण गमावले. गोळी लागल्यानंतर त्यांना जखमी अवस्थेमध्ये रुग्णालयात दाखल करण्यात आले होते मात्र उपचारादरम्यान त्यांनी आपले प्राण गमावले. उद्या गुरूवारी त्याच्या मुळगावी कोपरगावच्या दहीगाव बोलका येथे त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

वाल्टे यांचा सेवाकाळ पूर्ण झाल्यानंतर त्यांनी पाच वर्षे मुदत वाढवून घेतली होती. तीही आता संपत आल्याने लवकरच ते सेवानिवृत्त होणार होते. त्यांच्या मागे आई, वडील, पत्नी, एक नववीत शिकणारी मुलगी आणि पाच वर्षांचा मुलगा असा परिवार आहे. त्यांचे आई-वडील शेतकरी आहेत. वाल्टे यांचे प्राथमिक शिक्षण दहीगावमध्ये झाले. त्यानंतर कोपरगावमध्ये बारावीपर्यंत शिक्षण घेऊन ते सैन्यात भरती झाले. देशातील विविध ठिकाणी त्यांनी सेवा दिली. नुकतीच त्यांना नायब सुभेदारपदी बढती मिळाली होती. मंगळवारी झालेल्या कारवाईच्या वेळी गोळीबारात ते गंभीर जखमी झाले होते. त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र, त्यात यश आले नाही.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!