Aurangabad : गैरहजर राहणाऱ्या तीन पोलिसांचे आयुक्तांकडून निलंबन

औरंंंगाबाद : विधानसभा निवडणूकीच्या बंदोबस्त कामासाठी नियुक्ती असतांना देखील कामचुकारपणा करणा-या तीन पोलिस कर्मचाNयांना पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी मंगळवारी (दि.१५) तडकाफडकी निलंबित केले असल्याची माहिती गुन्हे शाखेचे सहाय्यक आयुक्त डॉ.नागनाथ कोडे यांनी दिली.
डॉ . कोडे यांनी याबाबत म्हटले आहे कि , अरूण सुर्यकांत लकडे (जवाहरनगर) ३ सप्टेंबरपासून , दिलीप नामदेव कदम (पुंडलिकनगर) ६ सप्टेंबरपासून , तर सावळाहरी दगडू खंडागळे (एमआयडीसी सिडको) २५ जूनपासून बेकायदेशीरपणे गैरहर आहेत . त्यामुळे त्यांना निलंबित करण्यात आले आहे. विधानसभा निवडणूकीनिमित्ताने शहरात गेल्या काही दिवसापासून विविध राजकीय पक्षाच्या व्हीआयपी नेत्यांची ये-जा सुरू आहे. यानिमित्ताने शहरात अधिक पोलिसांची बंदोबस्तासाठी गरज आहे परंतु सदर पोलीस कर्मचारी संबंधित तारखांपासून गैरहजर आहेत. या तिघांना निलंबित करण्यात आल्यामुळे पोलिस दलात एकच खळबळ उडाली आहे.