Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Aurangabad Crime : जबरी चोरी प्रकरणातील अट्टल गुन्हेगार गुन्हे शाखेच्या जाळ्यात, सहा वर्षापासून देत होता पोलिसांना गुंगारा

Spread the love

औरंंंगाबाद : गेल्या सहा वर्षापासून पोलिसांना गुंगारा देणा-या जबरी चोरी प्रकरणातील अट्टल गुन्हेगारास गुन्हे शाखा पोलिसांनी गजाआड केले. सुनिल उर्फ मुन्ना नारायण वाकडे (वय २३, रा.खंडोबा मंदीराच्या मागे, सातारा परिसर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव असल्याची माहिती गुन्हे शाखेचे सहाय्यक आयुक्त डॉ. नागनाथ कोडे यांनी बुधवारी (दि.१६) दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तेजुसिंग कचरूसिंग चौव्हाण (रा.इंदौर, मध्यप्रदेश) हा ट्रकचालक २९ ऑक्टोबर २०१३ रोजी छावणी परिसरातून जात असतांना त्याला मनोज दादाराव दाभाडे (वय २१), दिपक भिकाजी जोगदंड,दोघे राहणार क्रांतीनगर, सुनिल उर्फ मुन्ना वाकडे यांनी शस्त्राचा धाक दाखवून थांबविले होते. त्यानंतर ट्रकचालक तेजुसिंग चौव्हाण याला मारहाण करीत तिघांनी ७ हजार रूपये हिसकावून पोबारा केला होता. याप्रकरणी छावणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यावर पोलिसांनी मनोज दाभाडे, दिपक जोगदंड या दोघांना अटक केली होती. तर सुनिल उर्पâ मुन्ना वाकडे हा फरार होता.
दरम्यान, ट्रकचालकास लुटणारा सुनिल उर्फ मुन्ना वाकडे हा सातारा परिसरात फिरत असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती. गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक योगेश धोंडे, जमादार सैय्यद मुजीब अली, गजानन मांन्टे, आनंद वाहुळ, राहुल खरात, शेख बाबर आदींच्या पथकाने सातारा परिसरात सापळा रचून सुनिल उर्फ मुन्ना वाकडे याला बुधवारी गजाआड केले. गुन्हे शाखेचे सहाय्यक आयुक्त डॉ. नागनाथ कोडे, पोलिस निरीक्षक मधुकर सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक योगेश धोंडे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!