काँग्रेसच्या नेत्या, अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांची नाराजी दूर… लवकरच स्टार प्रचारक म्हणून होणार सहभागी

Urmila Matondkar, Bollywood actress-turned-politician who recently joined India's main opposition Congress party, gestures during her election campaign rally in Mumbai, India, April 11, 2019. REUTERS/Francis Mascarenhas
विधानसभा निवडणुकीसाठी स्टार प्रचारक म्हणून काँग्रेसच्या नेत्या, अभिनेत्री उर्मिला मातोंडकर लवकरच सहभागी होतील. तसेच संजय निरुपम यांची समजूत काढण्याचा यशस्वी प्रयत्न करणार असल्याची माहिती मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष एकनाथ गायकवाड यांनी शनिवारी दिली. ‘काँग्रेसमध्ये आता गटबाजी राहिलेली नसून, मतभेद सर्वच पक्षांमध्ये असतात,’ असेही ते म्हणाले.
काँग्रेसच्या नेत्या, अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांच्याशी माझे बोलणे झाले आहे. त्यांची नाराजी दूर झाली असून त्या लवकरच विधानसभा निवडणुकीसाठी स्टार प्रचारक म्हणून सहभागी होतील, असा दावा गायकवाड यांनी केला आहे. शुक्रवारी रात्री आरेतील झाडे तोडण्यासंदर्भात राज्य सरकारच्या विरोधात मुंबईकरांचा संताप आहे. मुंबईची स्मार्ट सिटी न होता केवळ शिवसेना आणि भाजपचे नेते स्मार्ट झालेले आहेत. गेली २० वर्षे मुंबई महानगरपालिकेत शिवसेना-भाजपची सत्ता आहे परंतु मुंबईकरांच्या मूलभूत नागरी सोयीसुविधांसाठी इतकी तत्परता शिवसेना-भाजप सरकारने कधीच दाखवली नाही, अशी टीकाही एकनाथ गायकवाड यांनी केला आहे.