Aurangabad Crime : लैंगिक अत्याचार झालेल्या ‘त्या’ चिमूकलीचा दुर्देवी मृत्यू, वेळेवर उपचार न मिळाल्याने ओढवला मृत्यू माता-पित्याच्या जबाबात विसंगती

औरंंंगाबाद : अवघ्या अडीच वर्षाच्या मुलीचा मृतदेह क्रांतीचौकात रस्त्यावर ठेवून गोधळ घालणा-या मद्यपी पित्याला नागरिकांनी शुक्रवारी (दि.२७) सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास चोप देत पोलिसांच्या स्वाधीन केले. अतिशय गुंतागुतीच्या या प्रकरणात अडीच वर्षाच्या चिमूकलीवर अत्यंत निर्दयीपणे लैंगिक अत्याचार करण्यात आला होता. लैंगिक अत्याचारानंतर चिमूकलीला वेळेवर उपचार न मिळाल्याने तिचा मृत्यू झाला असल्याची माहिती क्रांतीचौक पोलिस ठाण्याचे निरीक्षक उत्तम मुळक यांनी दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुलढाणा जिल्ह्यातील खामगांव येथे राहणारे शिवाजी भोसले (वय ३५) हे हॉटेलमध्ये कुक (स्वयंपाकी) म्हणून काम करतात. पाच ते सहा दिवसापुर्वी भोसले दांम्पत्य आपल्या मुलाबाळासह कामाच्या शोधासाठी इगतपुरीला गेले होते. परंतु तेथे काम न मिळाल्याने औरंगाबादला परत येत असतांना रेल्वेत पती-पत्नीची चुकामुक झाली होती. दरम्यान, मनमाड येथे शिवाजी भोसले यांची ओळख परभणीत राहणा-या एका सोबत झाली होती. त्यावेळी त्या अनोळखी व्यक्तीने भोसले यांच्या मुलांना खाऊ-पिऊ घातले होते. याकाळात भोसले यांची पत्नीसोबत पुन्हा भेट झाली त्यावेळी अडीच वर्षाच्या मुलीने गुप्तांगात दुखत असल्याचे रडतच सांगितले.
चिमूकलीचे दुखत असल्याने भोसले यांची पत्नी चार मुलांना घेवून औरंगाबादला मुकुंवाडी परिसरात राहणा-या नातेवाईकाकडे आली होती. नातेवाईक महिलेने दिलेल्या सल्यानुसार भोसले यांची पत्नी मुलीला घेवून चिकलठाण्यातील एका बाबाकडे जात असतांना अध्र्या रस्त्यातच तिचा मृत्यू झाला. मुलीचा मृतदेह घेवून भोसले यांची पत्नी औरंगाबाद रेल्वेस्टेशन येथे आली. शुक्रवारी सकाळी ८ वाजता शिवाजी भोसले औरंगाबादला आले. त्यानंतर ते दोघे मुलीचा मृतदेह घेवून मुकुंवाडीकडे जात असतांना क्रांतीचौकात रिक्षात बाचाबाची झाल्याने रिक्षाचालकाने दोघांना उतरवून दिले होते. त्यानंतर या सर्व घटनेचा उलगडा झाला.
दरम्यान, चिमूकलीचे शवविच्छेदन केले असता प्राथमिक अहवालात तिच्यावर अत्यंत निर्दयीपणे लैंगिक अत्याचार झाल्याचे समोर आले आहे.या दाम्पत्याकडे चिमूरडीवर अंत्यसंस्कार करण्यासाठीही पैशे नसल्यामुळे शवविच्छेदनानंतर पोलिस निरीक्षक उत्तम मुळक यांनी पुढाकार घेत अंत्यसंस्कार केले.हे प्रकरण राहूरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडल्याचे तपासात उघंड झाले आहे याप्रकरणी सायंकाळी उशिरापर्यंत क्रांतीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.गुन्हा दाखल झाल्यानंतर हा संबंधित पोलिस ठाण्याकडे वर्ग करण्यात येईल असे पोलिसांनी सांगितले