Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Aurangabad Crime : दागिने पळवणारी महिला चोरांची टोळी अटक, गुन्हेशाखेची कामगिरी

Advertisements
Advertisements
Spread the love

औरंगाबाद – एक महिन्यापूर्वी वेंदांत नगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत रिक्षातील सहप्रवासी महिलेचे १लाख ६हजारांचे सोन्याचे दागिने चोरणार्‍या महिला टोळक्याला गुन्हेशाखेने अटक केली.दिपा,(२५) संगीता(२०) आणि यल्लमा गाजवारे(४२) अशी अटक महिला चोरट्यांची नावे आहेत.
गेल्या २७आॅगस्ट रोजी जालाननगरातील सत्यशीला सदाफुले(५२)रा.लाभ गार्डन या बाबा पेट्रोलपंपाहून जालाननगर ला जाण्यासाठी एका रिक्षात बसल्या या वेळी रिक्षात तीन महिला आधिच बसल्या होत्या.जालाननगर ला उतरुन घरी गेल्यावर त्यांच्या पिशवीतील १लाख ६ह जारांचे दागिने आणि काही रोख रक्कम लंपास झाल्याचे सदाफुले यांच्या लक्षात आले. या प्रकरणी वेदांतनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.शुक्रवारी गुन्हेशाखेचे पोलिस निरीक्षक मधुकर सावंत यांना खबर्‍याने चोरट्या महिला पंढरपूर रस्त्यावरील ए.एस.क्लब समोर उभ्या असल्याचे सांगितले. त्यानुसार सहाय्यक पोलिस आयुक्त डाॅ. नागनाथ कोडे आणि पोलिस निरीक्षक सावंत यांनी आदेश दिल्यानंतर पी.एस.आय. योगेश धोंडे, पोलिस कर्मचारी दादा झारगड, गजानन मांटे, सय्यद अली, राहूल खरात, रोहिणी चिंचाळकर यांच्या पथकाने महिला चोरांना पकडले.वरील चोरट्यांनी सदाफुले यांचे दागिने चोरल्याची कबुली दिली.

Advertisements

आपलं सरकार

Click to listen highlighted text!