Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Aurangabad : वडिलांच्या अवयव प्रत्यारोपणाच्या मदतीसाठी मुलाचे टाॅवरवर चढून ‘शोले स्टाईल’ आंदोलन

Spread the love

औरंंंगाबाद : वडिलांच्या यकृत प्रत्यारोपणासाठी आवश्यक तेवढी मदत मिळावी, यासाठी करण्यात आलेल्या मागणीकडे अधिकारी आणि लोकप्रतिनिधींकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करून एका तरुणाने बुधवारी (दि.१८) सकाळी ११ च्या सुमारास ४०० फूट उंच टिव्ही सेंटरच्या टॉवरवर चढून शोले स्टाईल आंदोलन केले.


यासंदर्भात आत्महत्येचा प्रयत्न होत असल्याचे पाहून पोलीस अधिकारी, खासदार सय्यद इम्तियाज जलील, माजी नगरसेवक अभिजित देशमुख, तहसील कार्यालयाचे अधिकारी, कर्मचाNयांसह पोलीस, अग्निशमन दलाचा बंब घटनास्थळी दाखल झाला होता.  मंगेश संजय साबळे (वय ३५, रा.गेवराई पायगा, ता.फुलंब्री ) असे शोले स्टाईल आंदोलन करणा-या तरूणाचे नाव आहे.

मंगेश साबळे याच्या वडीलांना यकृताचा आजार असून यकृत प्रत्यारोपन करावे लागणार असल्याचे त्याला डॉक्टरांनी सांगितले.

त्यासाठी आवश्यक त्या तपासण्या करण्यात आल्या. त्यावर सहा लाख रुपये खर्च झालेला आहे. मात्र प्रशासनाकडून मदतीबाबत दिरंगाई झाल्याने प्रत्यारोपणाची प्रक्रिया लांबली आहे. त्यामुळे तपासण्यावर झालेला खर्च वाया गेला आहे. मंगेश साबळे याने गेल्या आठवड्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणही केले होते. त्यावेळी  जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घडवून आणतो, असे आश्वासन दिले होते. तर विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनीही मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मदत करण्याचे  आश्वासन दिले होते. मात्र कोणाकडून आश्वासक काही दिलासा मिळत नसल्याने आणि वडिलांची ढासळती प्रकृती पाहून आपल्यालाही जीवनात स्वारस्य उरले नसल्याने आत्महत्येशिवाय पर्याय नसल्याचे मंगेश साबळे याने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

दरम्यान, बुधवारी सकाळी मंगेश साबळे हा टिव्ही सेंटर परिसरातील दुरदर्शनच्या जवळपास ४०० पुâट उंचीच्या टॉवरवर चढला. सुरूवातीला दुरदर्शनचा कर्मचारी दुरूस्तीसाठी चढला असावा असे परिसरातील नागरीकांना वाटले. परंतु मंगेशने टॉवरवर चढुन जोर-जोरात आरडा ओरड करण्यास सुरूवात केली. तसेच माझी मागणी मान्य होत नसल्यामुळे मी टॉवरवर उडी मारून आत्महत्या करीत असल्याचे सांगितले. टिव्ही सेंटर येथील टॉवरवर चढुन मंगेश साबळे हा आत्महत्या करण्याची धमकी देत असल्याचे समजल्यावर जिल्हाधिकारी कार्यालयात एकच खळबळ उडाली. मंगेशची समजूत काढुन त्याला खाली उतरविण्यासाठी वरिष्ठ पोलिस अधिकारी, अग्निशमन दलाचे कर्मचारी, पोलिसांचा मोठा ताफा घटनास्थळी दाखल झाला होता. परंतु मंगेश कोणाचेही एैकत नव्हता. अखेर खासदार सय्यद इम्तियाज जलील यांनी घटनास्थळी धाव घेवून मंत्रालयात पाठपुरावा करण्याचे तसेच आर्थिक मदत करण्याचे आश्वासन दिल्यावर मंगेश साबळे हा खाली उतरला.


टिव्ही सेंटर चौकात जमली बघ्यांची गर्दी

मंगेश साबळे याने केलेले शोले स्टाईल आंदोलन बघण्यासाठी टिव्ही सेंटर चौकात बघ्यांची गर्दी जमा झाली होती. जमलेल्या गर्दीला आवरतांना तसेच रस्त्याच्या दोन्ही बाजूला झालेली वाहतुक कोंडी सोडवितांना पोलिसांची धांदल उडाली होती. यावेळी अनेकांनी आपल्या मोबाईलमध्ये व्हीडीओ शुटींग करून तसेच फोटो काढुन ते सोशल मिडियावर व्हायरल केल्यामुळे अनेकांनी टिव्ही सेंटर चौकाकडे धाव घेतली होती.


अनेकांनी दिले मंगेशला मदतीचे आश्वासन

मंगेश साबळे याच्या वडीलांच्या यकृत प्रत्यारोपणासाठी मदत करण्याचे आश्वासन यावेळी अनेकांनी दिले. त्यात खासदार सय्यद इम्तियाज जलील, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक अभिजीत देशमुख यांनी १ लाख रूपये, शिवसेनेचे पदाधिकारी सोनवणे यांनी ५१ हजार रूपये आर्थिक मदत करण्याचे आश्वासन यावेळी दिले.


 

आपलं सरकार

Click to listen highlighted text!