पंतप्रधान मोदींचा ६९ वा वाढदिवस, देशभरातून शुभेच्छांचा वर्षाव ! आणि पाकिस्तानी मंत्र्यांचा आगाऊपणा…
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज १७ सप्टेंबर रोजी ६९ वा वाढदिवस आहे. मोदींच्या वाढदिवसानिमित्त देशभरातील अनेक राजकीय नेते, मंडळी आणि कार्यकर्त्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे. पंतप्रधान मोंदीचा वाढदिवस आज असल्याने अनेक कार्यकर्त्यांनी आधीपासून तयारी करत आज एकच जल्लोष व्यक्त करताना दिसत असून अनेक कार्यक्रमाचंही आयोजन करत आहेत. दरवर्षी प्रमाणे यंदाही पंतप्रधान मोदी गुजरातमध्ये आपला वाढदिवस साजरा करणार आहेत. भारतीय जनता पक्षाने ३.३१ मिनिटांचा एक व्हिडीओ ट्वीट करत पंतप्रधान मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
देशभरातून मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या जात असून सोशल मीडियावर शुभेच्छांचा पाऊस पडत आहे. ट्विटरवर पहिल्या १० ट्रेंडपैकी ७ ट्रेंड केवळ मोदींच्या वाढदिवसाशी संबंधित आहेत. यामध्ये #HappyBdayPMModi, #HappyBirthdayPM, #NarendraModiBirthday यासारखे हॅशटॅग्स ट्रेंडिंग आहेत. मोदींच्या वाढदिवसानिमित्त देशभरातील त्यांचे समर्थक वेगवेगळ्या हॅशटॅगचा वापरून मोदींना शुभेच्छा देताना दिसत आहे.
देश-विदेशातील प्रसिद्ध व्यक्ती, नेते मंडळी मोदींना सोशल मीडियाच्या माध्यमातून वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. ट्वीटरवर तर सोमवारी (१६ सप्टेंबर) रात्रीपासूनच #HappyBirthdayNarendraModi टॉप ट्रेंडमध्ये आहे.
देशाचे गृहमंत्री आणि पंतप्रधान मोदींचे सर्वात निकटवर्तीय असलेले अमित शाह यांनींही ट्वीटरच्या माध्यमातून मोदींना शुभेच्छा दिल्या आहेत.
“दृढ इच्छाशक्ती, निर्णायक नेतृत्व आणि अथक परिश्रमचे प्रतिक देशातील सर्वात लोकप्रिय नेते पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. तुमच्या नेतृत्वात भारताने जगात एक मजबूत, सुरक्षित आणि विश्वसनीय देशाच्या रुपात आपली ओळख बनवली आहे. विकासासोबतच भारतीय संस्कृतीला आणखी समृद्ध करण्यात मोदीजी यांचं अभूतपूर्व योगदान आहे”, असं ट्वीट अमित शाह यांनी केलं.
“मोदीजींनी एक रिफार्मिस्टच्या रुपात केवळ राजकारणाला एक नवी दिशाच दिली नाही, तर आर्थिक सुधारणेसोबतच दशकांपासून चालत आलेल्या समस्यांचं समाधानही काढलं. प्रत्येक भारतीयाच्या जीवानाला अधिक चांगलं बनवण्यासाठी तुमचे परिश्रम आणि संकल्प आमच्यासाठी एक प्रेरणास्त्रोत आहे. एक जनप्रतिनिधी, एक कार्यकर्ता आणि एक देशवासीच्या रुपात तुमच्यासोबत राष्ट्रीय पुनर्रचनेत भागीदार होणे हे माझं सुदैव आहे. तुम्ही नेहमी निरोगी राहावे आणि दीर्घायुषी व्हावे हीच देवाचरणी प्रार्थना”, असंही अमित शाह म्हणाले.
पाकिस्तानच्या मंत्री फवाद यांनी केला आगाऊपणा आणि झाले टीकेचे धनी…
दरम्यान देश आणि जगभरातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर वाढदिवसाच्या शुभेच्छांचा वर्षाव सुरू असताना शेजारी देश पाकिस्तानमधील मंत्री चौधरी फवाद हुसेन यांनी लज्जास्पद ट्विट करत वाद ओढवून घेतला आहे. फवाद यांना पाकिस्तानातच विरोध होत असून पाक नागरिक या ट्विटबाबत त्यांचा निषेध करत आहेत. फवाद हुसेन यांनी यापूर्वीही असे वादग्रस्त ट्विट केले आहेत.
फवाद हुसेन यांनी आजचा दिवस आम्हाला गर्भनिरोधाचे महत्त्व काय याची आठवण देतो असे पंतप्रधान मोदी यांना टॅग करत म्हटले आहे.
फवाद यांच्या या ट्विटवर जोरदार टीका सुरू झाली आहे. काही लोकांनी तर फवाद यांची टर उडवत त्यांच्यावर मिम्स देखील शेअर करत आहेत. विशेष म्हणजे पाकिस्तानी नागरिकही या मंत्र्याचा निषेध करत आहेत. कराचीमधील एकाने कसे ट्विट केले पाहा! तो म्हणतो, ‘ आप को कोई कान नही दिया हैं खान साहब ने. सुबह सुबह जाहिलों जैसी ट्विट स्टार्ट कर दिये, सुबह काम पे जाओ…’
भारताच्या ‘चांद्रयान-२’ मोहिमेत विक्रम लँडरचा संपर्क तुटल्यानंतरही फवाद हुसेन यांनी ट्विट केले होते. त्यात त्यांनी म्हटले होते, ‘जो काम आता नहीं पंगा नही लेते ना… डियर इंडिया.’ या ट्विटवर पाकिस्तानी नागरिकांनी टीकास्त्र सोडले होते. या मंत्र्याने व्यंग करत इंडियाचा उल्लेख एंडिया असाही केला होता.