Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

GDP कमी झाल्याने शेअर बाजारावर प्रतिकूल परिणाम , सेन्सेक्स मध्ये मोठी घसरण

Spread the love

जीडीपी दर अपेक्षेपेक्षा कमी; तसंच इतर महत्वाच्या क्षेत्रांत कासवगतीनं सुरू असलेल्या विकासाचा परिणाम शेअर बाजारावर झाला. दुपारी सव्वातीनच्या सुमारास सेन्सेक्समध्ये तब्बल ८०० अंकांची घसरण नोंदवली आणि तो ३६,५००वर पोहोचला. निफ्टीतही २४.४० अंकांची घसरण नोंदवून तो १०७८२.८५ वर पोहोचला. सुरुवातीच्या सत्रात सकाळी १०.२२ वाजता सेन्सेक्स ४१३.५८ अंकांनी घसरून ३६, ९१९.२१ अंकांवर व्यवहार सुरू होते. निफ्टीतही १२९.३० अंकांची घसरण नोंदवली होती.

दरम्यान, उत्पादन क्षेत्रात ऑगस्टमध्ये विक्री घटल्यानं शेअर बाजारात निराशा आहे. उत्पादन घटल्यानं केलेली गुंतवणूक आणि खर्च यातील नुकसानही अद्याप भरून निघालं नाही. याआधी जूनच्या तिमाहीत जीडीपी दर सहा वर्षांतील निच्चांकीवर पोहोचलं होतं. ऑगस्टमध्ये वाहन विक्रीच्या आकडेवारीमुळं शेअर बाजारात निराशा आहे. मारुती सुझुकीच्या विक्रीत ३३ टक्क्यांहून अधिक घट झाली. टाटा मोटर्सच्या पेसेंजर वाहनांची विक्रीही ५८ टक्क्यांनी घसरली आहे. याशिवाय महिंद्रा अँड महिंद्रा, बजाज ऑटोच्या वाहन विक्रीतही घट नोंदवली आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!