Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Bigg Boss Marathi 2 : ‘रोडीज’ फेम शिव ठाकरे ठरला ‘बिग बॉस २’चा विजेता

Spread the love

छोट्या पडद्यावरील सर्वांत लोकप्रिय व तितकाच वादग्रस्त रिअॅलिटी शो ‘बिग बॉस मराठी २’चा विजेता कोण ठरणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलेल्या या शोच्या विजेतेपदावर शिव ठाकरेनं शिक्कामोर्तब केलं आहे. रविवारी संध्याकाळी सात वाजल्यापासून बिग बॉसचा महाअंतिम सोहळा रंगला होता . अंतिम फेरीत नेहा शितोळे, शिवानी सुर्वे, शिव ठाकरे, किशोरी शहाणे, आरोह वेलणकर व वीणा जगताप हे सहा स्पर्धक पोहोचले होते.


साहसी, जिगरबाज, लढवय्या अशा विशेषणांनी ज्याचे घरात नेहमीच कौतुक झाले असा अमरावतीचा पठ्ठ्या शिव ठाकरे बिग बॉस मराठी सिझन २ चा विजेता ठरला आहे. प्रेक्षकांनी दिलेल्या सर्वाधिक मतांच्या जोरावर शिवनं सिझन २ च्या विजेत्याचा किताब पटकावला आहे.  नेहा शितोळे आणि शिव ठाकरे हे दोघेही अंतिम फेरीत पोहोचले आणि विजेता म्हणून शिव ठाकरेचं नाव घोषित करण्यात आलं.

बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या पर्वाचा महाअंतिम सोहळ्यात नेहा शितोळे, शिवानी सुर्वे, शिव ठाकरे, किशोरी शहाणे, आरोह वेलणकर पोहोचले. हिंदीतील ‘रोडिज’मधून शिव ठाकरे हा मराठमोळा स्पर्धक नावारूपास आला. मूळचा अमरावतीचा असणाऱ्या शिव ठाकरेला बिग बॉसमुळे नवी ओळख मिळाली. बिग बॉसच्या घरातील पहिला कॅप्टन होण्याचा मान शिव ठाकरेनं पटकावला होता, आपल्या लाघवी स्वभावाने त्यानं घरातील सगळ्या सदस्यांची मनं जिंकली. घरातील त्याची वीणासोबत असणारी मैत्री तर विशेष गाजली.

विशेष म्हणजे शिव ठाकरे याला महेश मांजरेकर यांनी त्यांच्या आगामी चित्रपटात काम करण्याची संधी दिली आहे. ‘वीर दौडले सात’ या त्यांच्या सिनेमात शिव ठाकरे दिसणार आहे. महेश मांजरेकर यांनी बिग बॉस मराठीच्या महाअंतिम सोहळ्यात हे जाहीर केलं.

अमरावतीचा पठ्ठ्या शिव ठाकरे घरात प्रवेश केल्यापासूनच लोकप्रिय ठरला आहे. ‘रोडीज’ या रिअॅलिटी शोमधून तो चर्चेत आला होता. बिग बॉसच्या घरात सुरुवातीला तो थोडा शांतच राहिला. पण नंतर त्याने पकडलेला जोर कायम राहिला. बिग बॉसच्या घरातील पहिला कॅप्टन होण्याचा मान शिवने मिळवला होता. त्यानंतर टास्कमध्ये चांगली कामगिरी करत तो नॉमिनेशनपासूनही वाचत आला होता. वीणा जगतापसोबतची त्याची मैत्री विशेष चर्चेता विषय ठरली आहे. बिग बॉसनंतर हे दोघं लग्न करणार असल्याचंही म्हटलं जात आहे.

महाअंतिम सोहळ्यात स्पर्धकांचे नृत्याविष्कार पाहायला मिळाले. किशोरी शहाणे ‘घर मोरे परदेसिया’ गाण्यावर थिरकल्या तर हिना पांचाळने ‘साकी साकी’ आणि अभिजीत बिचुकलेने ‘सारा जमाना’ या गाण्यावर डान्स सादर केला. तसंच अभिजीत केळकर, वैशाली म्हाडे, रुपाली जाधव, माधव देवचके, मैथिली जावकर यांचेही जबरदस्त डान्स परफॉर्मन्स पाहायला मिळाले.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!