या सिने अभिनेत्याला आपण ओळखलंत ? हा होता करीना कपूरचा “क्रश “

महेश भट दिग्दर्शित ‘आशिकी’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारा अभिनेता राहुल रॉय याने आपल्या अभिनयामुळे १९९०चा काळ गाजवला होता. ‘आशिकी’ या ब्लॉकबस्टर चित्रपटामुळे १९९० च्या काळात राहुलने लोकप्रिय अभिनेत्यांचा यादीत स्वत:चे स्थान कायम केले होते. आशिकीप्रमाणेच ‘जानम’, ‘सपने सजा के रखना’ या चित्रपटांमध्येही राहुल झळकला होता. काही काळ चित्रपटसृष्टीत घालविल्यानंतर त्याने रुपेरी पडद्यापासून फारकत घेतली. आता राहुल रॉयचे फोटो पाहिल्यास त्याला ओळखणंही कठीण झालं आहे.
काही दिवसांपूर्वी अभिनेत्री करिना कपूरने एका रिअॅलिटी शोमध्ये तिच्या क्रशबद्दल सांगितलं. ”राहुल रॉय मला खूप आवडायचा. त्याचा आशिकी हा चित्रपट मी आठ वेळा पाहिला होता,” असं तिने सांगितलं होतं. तेव्हापासून पुन्हा एकदा राहुलची चर्चा झाली. चित्रपटसृष्टीपासून लांब गेलेला राहुल सोशल मीडियावर सक्रिय आहे. करिनाच्या बातमीचा स्क्रीनशॉट शेअर करत राहुलने तिचे आभार मानले होते. या पोस्टमध्ये त्याने तिच्यासोबत काम करण्याची इच्छासुद्धा व्यक्त केली.
राहुलने २००७ साली ‘बिग बॉस’ या हिंदी रिअॅलिटी शोच्या पहिल्या सीजनचा किताबही जिंकला होता. त्यानंतर तो ऑस्ट्रेलियामध्ये गेला. ऑस्ट्रेलियामध्ये ८ वर्ष राहिल्यानंतर तो २०१५ मध्ये पुन्हा भारतात परतला आहे. राहुल त्याच्या अफेअरमुळेही चर्चेत होता. पत्नी राजलक्ष्मी खानविलकरला घटस्फोट दिल्यानंतर राहुल रॉय मॉडेल साधना सिंगला डेट करत असल्याच्या चर्चा होत्या.