Aurangabad : केंद्रीय सेन्सॉर बोर्डच्या सदस्यपदी अॅड. सिकंदर अली यांची निवड

केंद्रीय सेन्सॉर बोर्डच्या सदस्यपदी शहरातील ख्यातनाम विधीतज्ञ अॅड. सिकंदर अली यांची नुकतीच निवड करण्यात आली आहे. अॅड. सिकंदर अली हे महाराष्ट्र अॅण्ड गोवा नोटरी असोसिएशनचे अध्यक्ष असून त्यांचे शिक्षण एमएस्सी, एल.एल.एम.पर्यंत झाले आहे. अॅड.सिकंदर अली यांची केंद्रीय सेन्सॉर बोर्डच्या सदस्यपदी नियुक्ती झाल्याबद्दल निवृत्त न्यायाधीश सय्यद ए.ए., मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश व्ही.आर.किनगावकर, न्या. विनोद पाडळकर, अॅड.राजेंद्र देशमुख, अॅड.अविनाश देशमुख, अतिरिक्त पोलिस महासंचालक संजय कुमार, रितेश कुमार, पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद, अॅन्टी करप्शन विभागाचे पोलिस अधीक्षक अरविंद चावरीया, नविनचंद्र रेड्डी, इलाही पठाण, औरंगाबादचे माजी पोलिस आयुक्त अमितेश कुमार, सेवानिवृत्त उपअधीक्षक जेम्स अंबीलढगे, शोएब खुसरो, सलीम सिद्दीक्की आदींनी अभिनंदन केले आहे.