Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Uttar Pradesh : उन्नाव बलात्कारः आरोपी आमदाराची अखेर भाजपमधून हकालपट्टी

Spread the love

उन्नाव बलात्कार प्रकरणातील आरोपी भाजप आमदार कुलदीप सिंह सेंगरची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. याआधी कुलदीप सिंहला भाजपने निलंबित केले होते. परंतु, बलात्कार पीडितेचा अपघात झाल्यानंतर संशयाची सुई कुलदीपकडे जात असल्याने भाजपने कुलदीपची पक्षातून हकालपट्टी केली आहे.

उन्नाव खटला उत्तर प्रदेश राज्याबाहेर चालवण्याचे निर्देश सुप्रीम कोर्टाने आज दिले आहे. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर भाजपने काही तासांच्या आत कुलदीप सिंह सेंगरची पक्षातून हकालपट्टी केली आहे. आरोपी कुलदीपला भाजपचा पाठिंबा मिळत असल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. परंतु, विरोधकांच्या आरोपानंतर कुलदीप सिंह सेंगरला पक्षातून दोन वर्षासाठी निलंबित करण्यात आले आहे, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष स्वतंत्र देव सिंह यांनी म्हटले होते. पण त्यानंतर सेंगरच्या पत्नीने मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेतल्याचे फोटो सोशल मीडियावरून व्हायरल झाल्याने विरोधकांनी भाजपला चांगलेच धारेवर धरले होते.

काँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी यांनी उन्नाव घटनेवरून मोदी सरकारवर हल्ला चढवला होता. प्रियांका गांधी यांनी ट्विट करीत कुलदीप सिंह सेंगरची भाजपने हकालपट्टी करावी अशी मागणी केली होती. दरम्यान, अपघातात मृत्युमुखी पडलेल्या उन्नाव पीडित मुलीच्या काकीवर बुधवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्यसंस्काराला पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!