Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

उन्नाव पिडितेशी संबंधित सर्व प्रकरणे राज्याबाहेर चालविण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

Spread the love

उन्नाव बलात्कारातील सर्व प्रकरणे हे उत्तर प्रदेश राज्याबाहेर ट्रान्सफर करण्याचे निर्देश आज सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. उन्नाव प्रकरणातील पीडित व्यक्तीची मागणी मान्य करीत सर्वोच्च न्यायालयाने हे निर्देश दिले आहेत. या खटल्यासंबंधीचा तपास, सुनावण्या या उत्तर प्रदेश राज्याबाहेर चालवण्यात याव्यात. तसेच सीबीआयने येत्या ७ दिवसांत प्रकरणाची सगळी माहिती सादर करावी, तसेच आज दुपारी दोन वाजेपर्यंत पीडितेचा आरोग्य अहवाल सादर करा असे निर्देश सुप्रीम कोर्टाने तपास यंत्रणेला दिले आहेत.

उन्नाव प्रकरणातील आतापर्यंत झालेला तपास आणि पीडितेच्या अपघातासंबंधीच्या माहितीचा अहवाल आज दुपारी १२ वाजेपर्यंत सादर करण्याचे निर्देश तपास यंत्रणेला सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. तसेच पुढील सुनावणीसाठी सॉलिसिटर जनरल आणि सीबीआय आधिकाऱ्यांना उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहेत. उन्नाव बलात्कार प्रकरणातील पीडित कुटुंबाने सुप्रीम कोर्टाला पत्र लिहून कुलदीप सिंह सेंगर यांच्यापासून जीवाला धोका असून हे प्रकरण उत्तर प्रदेश बाहेर चालवण्यात यावे, अशी मागणी केली होती. सुप्रीम कोर्टाने पीडित कुटुंबाची मागणी मान्य करीत या प्रकरणातील सर्व प्रकरणे उत्तर प्रदेशबाहेर चालवण्यात यावे असे निर्देश दिले आहेत. दरम्यान, सीबीआयने येत्या ७ दिवसांत प्रकरणाची सगळी माहिती सादर करावी, तसेच आज दुपारी दोन वाजेपर्यंत पीडितेचा आरोग्य अहवाल सादर करा असे निर्देश सुप्रीम कोर्टाने तपास यंत्रणेला दिले आहेत.

भाजपाचे यांच्यावर आरोप करणारी उन्नाव येथील सामूहिक बलात्काराच्या घटनेतील पीडित तरूणी अपघातात गंभीर जखमी झाली आहे. या अपघातात पीडित तरूणीच्या आई व काकूसह वाहनचालकाचा मृत्यू झाला आहे. तर, पीडित तरूणी आणि तिच्या वकीलास गंभीर दुखापत झाली आहे. त्यांना लखनऊ येथील ट्रामा सेंटरमध्ये दाखल करण्यात आले आहे. पीडित तरूणी कुटुंबासह रायबरेली तुरूंगात असलेल्या आपल्या काकाची भेट घेऊन परत येत असताना हा अपघात घडला. हा अपघात नसून हत्या करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप करण्यात येत आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!