Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

मायावती : स्वत:ला हरिशचंद्र समजणाऱ्या भाजपने निवडणुकीच्या वेळी दोन हजार कोटी रुपये कुठून आणले?

Spread the love

प्राप्तिकर विभागाने गुरुवारी बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्षा मायावती यांचे भाऊ आणि पक्षाचे उपाध्यक्ष आनंद कुमार यांच्या ४०० कोटी रुपये किंमतीची जमिन जप्त केली आहे. त्यामुळे मायावती चांगल्याच भडकल्या आहेत. मोदी सरकार प्रशासनाचा गैरवापर करत असल्याचा आरोप मायावतींनी केला आहे. शुक्रवारी त्यांनी पत्रकार परिषद घेऊन मोदी सरकारवर टीका केली. यावेळी त्यांनी भाजप मंत्र्यांवरही टीका केली.

मायावती यांच्या भावाच्या विरोधात करण्यात आलेल्या कारवाईवर मायावती नाराज आहेत. त्यांच्या मते भाजपचे नेत्यांनी देखील अशाप्रकारे घोटाळे केले आहेत, त्यामुळे त्यांचीही चौकशी व्हायला हवी. मायावती म्हणाल्या की, ‘जे भाजप नेते प्रमाणिकपणाचा आव आणत आहेत, त्यांची देखील चौकशी व्हायला हवी. कारण, राजकारणात येण्याअगोदर त्यांच्याजवळी किती संपत्ती होती आणि आता किती संपत्ती आहे? खरंतर वंचित समाज पुढे गेला की, लोकांना त्रास होतो.’ स्वत:ला हरिशचंद्र समजणाऱ्या भाजपने निवडणुकवेळी दोन हजार कोटी रुपये कुठून आणले? असा प्रश्न मायावतींनी उपस्थित केला. यावेळी मायावतींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रिय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर देखील टीका केली.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!