Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Congress : पक्षाच्या कार्यकारी समितीची बैठक बोलवून नव्या अध्यक्षाची निवड करा : राहुल गांधी

Spread the love

मी आता काँग्रेस अध्यक्षपदावर नसून पक्षाच्या कार्यकारी समितीने तातडीने बैठक बोलवून नव्या अध्यक्षाची निवड करावी असे राहुल गांधी यांनी बुधवारी स्पष्ट केले. मी आधीच राजीनामा दिला असून कार्यकारी समितीने नव्या अध्यक्षाची निवड करावी असे राहुल यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

लोकसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवानंतर राहुल गांधी यांना काँग्रेस अध्यक्षपदावरुन दूर व्हायचा निर्णय घेतला. पण त्यांनी राजीनामा देऊ नये अशी काँग्रेसच्या नेते, पदाधिकाऱ्यांची इच्छा आहे. मी आधीच राजीनामा दिला असून आता काँग्रेसचा अध्यक्ष नाही. कार्यकारी समितीने लवकरात लवकर नव्या अध्यक्षाची निवड करावी असे राहुल पत्रकारांशी बोलताना म्हणाले.

राहुल गांधी यांची २०१७ साली काँग्रेस अध्यक्षपदावर निवड झाली होती. लोकसभा निवडणुकीतील पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारुन २५ मे रोजीच्या पक्षाच्या बैठकीत त्यांनी राजीनाम्याचा प्रस्ताव सादर केला. काँग्रेसच्या कार्यकारी समितीने एकमताने त्यांचा राजीनामा फेटाळला. त्यानंतर काँग्रेसच्या अनेक मोठया नेत्यांची त्यांची भेट घेऊन राजीनाम्याच्या निर्णयावरुन मन वळवण्याचा प्रयत्न केला. पण राहुल गांधी आपल्या निर्णयावर ठाम आहेत. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला फक्त ५२ जागा जिंकता आल्या. २०१४ च्या तुलनेत काँग्रेसच्या फक्त आठ जागा वाढल्या.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!