Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

मुंबई: मालाडमध्ये भिंत कोसळून १८ ठार, ५०हून अधिक जखमी, मृतांच्या नातेवाईकांना मुंख्यमंत्र्यांची ५ लाखांची मदत

Spread the love

मालाडमधील पिंपरीपाडा परिसरातील झोपड्यांवर भिंत कोसळून मोठी दुर्घटना झाली आहे. या दुर्घटनेत १८ जण ठार झाले असून ५० हून अधिक जखमी झाले आहेत. तर, चौघांची प्रकृती चिंताजनक आहे. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. ठार झाले आहेत.

मालाड दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत- मुख्यमंत्री

मुख्यमंत्र्यांनी आपत्कालीन कक्षला भेट देऊन सज्ज राहण्याचे आदेश दिले आहेत. गेल्या ४ तासांत ३०० मिमि पावसाची नोंद झाली असून पुढील ३ दिवस पावसाचा जोर कायम राहणार असल्याची माहिती मिळत आहे. त्या दृष्टीनं महापालिका, एनडीआरएफ सज्ज असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. त्याच प्रमाणे मालाड दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाखांची मदत देण्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं आहे.

अमिताभ बच्चन यांच्या घरासमोरही साचलं गुडघाभर पाणी

ठाण्यात एकाचा करंट लागून मृत्यू झाला असून बदलापूर कोंडेश्वर येथे एका तरुणाचा बुडून मृत्यू झाला आहे. मुंबईतील अनेकांच्या घरांमध्ये मध्यरात्रीपासून पाणी भरल्याने अनेकांना अख्खी रात्र जागून काढावी लागली आहे. रात्री दोन वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली. घटनास्थळी बचावकार्य सुरू असून एनडीआरएफचे पथक दाखल झाले आहे. अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकले आहेत. एक महिला तिच्या बाळासह ढिगाऱ्याखाली असल्याचं आढळून आलं आहे. तिला सुखरूप बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. जखमींवर शताब्दी रुग्णालयात आणि जोगेश्वरी येथील ट्रॉमा केअर सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत.

मालाड दुर्घटनेमध्ये मृतांचा आकडा आता १८ वर पोहचला आहे. दरम्यान, भिंतीखाली अडकलेल्या नागरिकांना वाचवण्याचं काम सुरू आहे. आई आणि मुलगा यांना बाहेर काढणासाठी भिंत कापली जात आहे.

राज्यात गेल्या ४ दिवसांपासून सुरु असेलल्या पावसामुळे भिंत कोसळून झालेल्या दुर्घटनेत २७ जणांचा मृत्यू झाला आहे. शनिवारी पुण्यातील कोंढवा भागात भिंत कोसळून १५ जणांचा मृत्यू झाला होता. त्यात मालाडमध्ये अशीच घटना घडली आहे. मध्यरात्री दोनच्या सुमारास ही घटना घडली. मालाडमधील कुरार भागात ही घटना घडली असून त्यात १८ जणांचा मृत्यू झाला आहे. मालाडमध्ये सध्या मदत आणि बचाव कार्य सुरु आहे. अग्निशमन दलाचे जवान आणि एनडीआरएफ देखील मदत कार्य करत आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!