Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

” एक देश एक निवडणूक ” नरेंद्र मोदींनी बोलावलेल्या बैठकीचे निमंत्रण ममता बॅनर्जी यांनी नाकारले

Spread the love

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीत सहभागी होण्यास नकार दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘एक देश एक निवडणूक’ या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी ही बैठक बोलवाली होती. ममता बॅनर्जी यांनी इतक्या महत्त्वाच्या विषयावर निर्णय घेण्यासाठी फक्त एक दिवस चर्चा करणं पुरेसं ठरणार नाही असं म्हटलं आहे. ‘एक देश एक निवडणूक’ ही संकल्पना अनेक विरोधी पक्षांनी डावलली आहे. अनेक नेत्यांनी सरकारने चर्चा करण्यासाठी बोलावलेल्या बैठकीचं निमंत्रणही नाकारलं आहे.

ममता बॅनर्जी यांनी संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे की, याप्रकरणी व्हाइट पेपर आणणं गरजेचं आहे. तसंच या मुद्द्यावर तज्ञांशी सल्ला मसलत करणंही तितकंच गरजेचं आहे.

‘एक देश एक निवडणूक सारख्या संवेदनशील आणि गंभीर विषयावर योग्य उत्तर मिळालं पाहिजे. इतक्या कमी वेळात या विषयाला योग्य तो न्याय मिळणार नाही. याप्रकरणी राज्यघटनेची संपूर्ण माहिती असणारे तसंच निवडणूक तज्ज्ञ आणि सर्व पक्ष सदस्यांशी चर्चा करण्याची गरज आहे’, असं ममता बॅनर्जी यांनी म्हटलं आहे.

‘इतकी घाई करण्यापेक्षा या विषयावर तुम्ही व्हाइट पेपर जारी करत सर्व पक्षांकडून त्यांचं मत मागवलं पाहिजे अशी मी तुम्हाला विनंती करते. जर तुम्ही असं केलंत तरच या विषयावर आम्ही तुम्हाला काही ठोस सूचना देऊ शकतो’, असं मत ममता बॅनर्जी यांनी व्यक्त केलं आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!