Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

बेपत्ता विमान AN-३२ ची माहिती देणाऱ्यास ५ लाख इनाम

Spread the love

भारतीय हवाई दलाचं बेपत्ता विमान AN-32 विषयी आज सहाव्या दिवशीही कुठलीच माहिती मिळालेली नाही. या विमानाची ठोस माहिती देणाऱ्याला पाच लाख रुपयांचं इनाम हवाई दलानं जाहीर केलं आहे. संरक्षण दलाचे जनसंपर्क अधिकारी विंग कमांडर रत्नाकर सिंह यांनी शिलॉंगमध्ये सांगितले की एअर मार्शल आर. डी. माथूर, एओसी इन कमांड, इस्टर्न एअर कमांड यांनी या बेपत्ता विमानाची माहिती सांगणाऱ्याला पाच लाख रुपयांचं इनाम देण्याची घोषणा केली आहे.

 

हवाई दलाच्या आसाममधून ३ जून रोजी बेपत्ता झालेल्या ए एन ३२ या मालवाहू विमानाचा सर्वतोपरी प्रयत्न करून अजूनही शोध लागलेला नाही. ज्या भागात विमान कोसळले असल्याची शक्यता आहे, त्या भागात कमी उंचीवरचे दाट ढग आणि पावसामुळे शोधकार्यात अडचणी येत आहेत. इस्रोच्या उपग्रहांमार्फत तसेच शोधकार्यातील हेलिकॉप्टर, विमानांवरील सेन्सर्सच्या माध्यमातून मिळालेल्या माहितीचे पृथ्थकरण सुरू आहे. दरम्यान, हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल बी. एस. धनोआ यांनी आज जोरहाट हवाई तळाला भेट देऊन शोधकार्याची माहिती घेत सूचना केल्या. तसेच बेपत्ता ए एन ३२ मधील कर्मचाऱ्यांच्या नातेवाइकांचीही भेट घेतली.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!