Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

ईडीने दुसऱ्यांदा बजावले समन्स, प्रफुल्ल पटेल यांच्या अडचणीत वाढ

Spread the love

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी नागरी उड्डाण मंत्री प्रफुल्ल पटेल यांच्या अडचणींमध्ये भर पडली आहे. कारण ईडी अर्थात अंमलबजावणी संचलनालयाने दुसऱ्यांदा समन्स बजावले आहे. या आधी मागच्या शनिवारी त्यांना समन्स बजावण्यात आले होते. मात्र ईडीसमोर ते हजर झाले नाहीत. आपल्याला पूर्व नियोजित कार्यक्रम आहेत असे कारण त्यावेळी त्यांनी दिले.त्यामुळे आता त्यांना दुसऱ्यांदा समन्स बजावण्यात आले आहेत. आता ईडीने प्रफुल्ल पटेल यांना १० किंवा ११ जून रोजी हजर रहाण्यासंबंधी समन्स बजावले आहेत. खरंतर आधीच्या समन्समध्ये ईडीसमोर हजर राहण्यासाठी त्यांना ६ जून ही तारीख देण्यात आली होती. मात्र तेव्हा ते ईडीसमोर हजर राहिले नाहीत. आता त्यांना पुन्हा एकदा समन्स बजावण्यात आले आहेत.

यूपीए सरकारच्या कार्यकाळातील कोट्यवधी रुपयांच्या हवाई वाहतूक घोटाळ्याप्रकरणी एअर इंडिया संबंधित प्रकरणात हे समन्स बजावण्यात आले आहे. हवाई वाहतूक घोटाळ्यात एअर इंडियाला झालेल्या नुकसानाशी संबंधित आर्थिक गैरव्यवहाराच्या तपासाचा भाग म्हणून ईडीने राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी नागरी विमान वाहतूकमंत्री प्रफुल्ल पटेल यांना चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!