Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

World Cup 2019 : आफ्रिकेची अडखळत सुरुवात, सलामीवीर तंबुत परतले

Spread the love

टीम इंडिया आज आपला पहिलाच सामना खेळत आहे. गेल्या काही दिवसांमध्ये भारतीय संघासाठी चौथ्या क्रमांकावर कोण फलंदाजी करणार हा प्रश्न महत्वाचा बनला होता. सराव सामन्यात लोकेश राहुलने शतक झळकावत या प्रश्नावर तात्पुरता तोडगा काढला आहे. त्यातच आजच्या सामन्याआधी साऊदम्पटनमधलं हवामान थोडसं ढगाळ होतं, त्यामुळे आजच्या सामन्यावर पावसाचं सावट असल्याची शक्यता बोलली जात आहे. दरम्यान नाणेफेक जिंकून आफ्रिकेचा कर्णधार फाफ डु प्लेसिसने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला खेळ चालू आहे .

साऊदम्पटनच्या मैदानावर हा सामना रंगणार आहे. आपल्या पहिल्या दोन सामन्यांमध्ये दक्षिण आफ्रिकेला पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्यातच आफ्रिकेचा जलदगती गोलंदाज डेल स्टेन दुखापतीमुळे स्पर्धेबाहेर गेला आहे. हाशिम आमलाही फारसा तंदुरुस्त नसल्यामुळे दक्षिण आफ्रिकेसमोर मोठं संकट उभं राहिलं आहे. त्यामुळे सलग दोन पराभवांमुळे खचलेला आफ्रिकेचा संघ आजच्या सामन्यात कसा खेळ करतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

यावर्षीच्या वर्ल्डकपमधील पहिला सामना भारत आज दक्षिण आफ्रिकेविरोधात खेळणार आहे. या विश्वचषकात भारताला आपलं आव्हान टिकवून ठेवायचं असेल तर पहिले तीन सामने जिंकणं अत्यंत महत्त्वाचं आहे.  भारत पहिले तीन सामने दक्षिण आफ्रिका, न्यूझिलंड आणि ऑस्ट्रेलियाविरोधात खेळणार आहे. हे तिन्ही तगडे संघ आहेत. यावेळी विश्वचषकाचे स्वरूप थोडे बदलले आहे. प्रत्येक संघ ९ सामने खेळणार आहे. या ९ पैकी सहा सामने जिंकणारे संघच उपांत्य फेरीत धडक देतील. तेव्हा उपांत्य फेरीत जागा बनवायची असेल तर भारताला या तीन पैकी २ सामने जिंकावेच लागतील. या सामन्यांमध्ये पराभव झाला तर मात्र उरलेले सहा सामने जिंकणं भाग होईल. त्यातही श्रीलंका, बांग्लादेश आणि अफगाणिस्तानाला मोठ्या फरकाने हरवावं लागेल. हे तिन्ही देश कधीही अनपेक्षित खेळासाठी प्रसिद्ध आहेत. तेव्हा भारत हे तीन सामने जिंकतो का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

टीम इंडियाचं विश्वचषकानंतरच्या सामन्यांचं वेळापत्रक जाहीर

विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया सध्या इंग्लंडमध्ये विश्वचषक स्पर्धेत खेळत आहे. सर्व देशावर सध्या विश्वचषकाचा फिव्हर चढलेला आहे. ही स्पर्धा सुरु असतानाच बीसीसीआयने भारतीय संघासाठी विश्वचषकानंतरच्या सामन्यांचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. विश्वचषकानंतर भारतीय संघ घरच्या मैदानावर ५ कसोटी, ९ वन-डे आणि १२ टी-२० सामने खेळणार आहे. २०२० साली ऑस्ट्रेलियात होणारा टी-२० विश्वचषक डोळ्यासमोर ठेऊन बीसीसीआय टी-२० सामन्यांना अधिक प्राधान्य देत आहे.

फ्रिडम चषक २०१९ (विरुद्ध दक्षिण आफ्रिका)

१५ सप्टेंबर – पहिली टी-२०, धर्मशाला
१८ सप्टेंबर – दुसरी टी-२०, मोहाली
२२ सप्टेंबर – तिसरी टी-२०, बंगळुरू

२ ते ६ ऑक्टोबर – पहिली कसोटी, विशाखापट्टणम
१० ते १४ ऑक्टोबर – दुसरी कसोटी, रांची
१९ ते २३ ऑक्टोबर – तिसरी कसोटी, पुणे

बांगलादेशचा भारत दौरा –

3 नोव्हेंबर – पहिली टी-२०, दिल्ली
७ नोव्हेंबर – दुसरी टी-२०, राजकोट
१० नोव्हेंबर – तिसरी टी-२०, नागपूर

१४ ते १८ नोव्हेंबर- पहिली कसोटी, इंदूर
२२ ते २६ नोव्हेंबर – दुसरी कसोटी, कोलकाता

विंडीजचा भारत दौरा –

६ डिसेंबर – पहिली टी-२०, मुंबई
८ डिसेंबर – दुसरी टी-२०, तिरुवनंतपुरम
११ डिसेंबर – तिसरी टी-२०, हैदराबाद

१५ डिसेंबर – पहिली वन डे, चेन्नई
१८ डिसेंबर – दुसरी वन डे, विशाखापट्टणम
२२ डिसेंबर – तिसरी वन डे, कटक

झिम्बाब्वेचा भारत दौरा – (२०२०)

५ जानेवारी – पहिली टी-२०, गुवाहाटी
७ जानेवारी – दुसरी टी-२०, इंदूर
१० जानेवारी – तिसरी टी-२०, पुणे

ऑस्ट्रेलियाचा भारत दौरा – (२०२०)

१४ जानेवारी – पहिली वन डे, मुंबई
१७ जानेवारी – दुसरी वन डे, राजकोट
१९ जानेवारी – तिसरी वन डे, बंगळुरू
दक्षिण आफ्रिकेचा भारत दौरा – (२०२०)

१२ मार्च – पहिली वन डे, धर्मशाला
१५ मार्च – दुसरी वन डे, लखनऊ
१८ मार्च – तिसरी वन डे, कोलकाता

आपलं सरकार

Click to listen highlighted text!